'शिवसेनेसोबत पंगा नको', भाजपच्या बैठकीत नेमकं काय झालं?

'शिवसेनेसोबत पंगा नको', भाजपच्या बैठकीत नेमकं काय झालं?

राज्य सरकारच्या मुंबई इथल्या सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात तब्बल अडीच तास राजकीय खलबतं चालली.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 19 डिसेंबर : राज्य सरकारच्या मुंबई इथल्या सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात तब्बल अडीच तास राजकीय खलबतं चालली. त्यानंतर आता 19 डिसेंबरला मुख्यमंत्री भाजप आमदारांची बैठक बोलवणार आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.

पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये भाजपचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. विशेषत: तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षानं जाहीर वाद टाळत सामोपचारानं घेण्याची भूमिका घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच लोकसभा मतदार संघांबद्दल विभागवार चर्चा झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात भाजपला इतर राज्यात निवडणुकीत बसत असलेला फटका, राज्यातील दुष्काळी परिस्थती, तसंच मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारनं केलेल्या कर्जमाफी विषयीही या बैठकीत चर्चा झाली. तसंच राज्य आणि केंद्र सरकाराने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयीही सर्वोतपरी प्रयत्न केले जावेत याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

तसंच विरोधकांच्या टीकेला आक्रमकपणे उत्तर देणं गरजेचं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपनं लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असून बैठकींचा सिलसालही वाढला आहे. लोकसभेत राज्याच्या ४८ जागा असल्यानं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र भाजपकरता महत्त्वाचं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कालच मुंबई पुण्यात मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्यामुळे एकप्रकारे निवडणुकींचं बिगूल वाजलं असं म्हणायला हरकत नाही. आज मुख्यमंत्री भाजप आमदारांची बैठक घेत राज्यभरातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार आहेत.


VIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 08:41 AM IST

ताज्या बातम्या