Home /News /news /

Lockdownच्या काळात EPFचा आधार; महाराष्ट्रात 5 महिन्यात काढले 7 हजार 800 कोटी

Lockdownच्या काळात EPFचा आधार; महाराष्ट्रात 5 महिन्यात काढले 7 हजार 800 कोटी

या संबंधात लोकसभेत आज प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावर उत्तर दिलं.

या संबंधात लोकसभेत आज प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावर उत्तर दिलं.

लॉकडाऊमुळे (Lockdown) सगळ्यांचं आर्थिक गणितच कोलमडून गेलं अशा काळात लोकांना Employees Provident Fund (EPF)ची मदत झाली.

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर: कोरोना संकटाच्या (Coronavirus in India) काळात देशात लाखो तरुणांची नोकरी गेली (Job Loss). अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली. कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. लॉकडाऊमुळे (Lockdown) सगळ्यांचं आर्थिक गणितच कोलमडून गेलं अशा काळात लोकांना Employees Provident Fund (EPF)ची मदत झाली. 25 मार्च ते 31 ऑगस्‍ट या काळात देशभर ईपीएफ मेंबर्स (EPF Members)नी तब्बल 39 हजार कोटी रुपये काढले अशी माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी 7,837.85 कोटी रुपये काढले आहे. कर्जाचे हफ्ते चुकवणं आणि घरं चालविण्यासाठी या पैशाचा उपयोग करण्यात आला. कर्नाटक (Karnataka) 5,743.96 कोटी तमिळनाडू (Tamil Nadu) आणि पाँडीचेरीत 4,984.51 कोटी काढण्यात आले. दरम्यान, जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. सोमवारी अमेझॉनने याविषयी घोषणा केली. Amazon.com ने याविषयी माहिती देताना सांगितलं की, लवकरच ऑनलाईन ऑर्डरच्या वितरणावर कंपनी नव्याने काम करणार असून 1 लाख लोकांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे.' कोणत्याही मोठ्या डिग्रीशिवाय 'ही' कंपनी देत आहे 30 हजार लोकांना नोकरी! Amazon ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 'या वितरणाच्या कामासाठी बारावी उत्तीर्ण असणं एवढीच पात्रता पुरेशी आहे. यामध्ये पार्ट टाइम आणि फुल टाइम कामासाठी भरती होणार असून पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात ही नोकरभरती केली जाणार आहे.' अमेझॉन कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं. याविषयी अधिक माहिती देताना कंपनीने सांगितलं की, त्यांना 100 नवीन वेअरहाऊस आणि अन्य कामांसाठी माणसांची गरज आहे. या वेअर हाऊसचं काम पाहणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी याविषयी सांगितले कि, अमेझॉन काही शहरांमध्ये 1,000 डॉलर साइन इन बोनस देखील देत आहे. त्यांच्या मते डेट्रॉइट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि लुइविले, केंटकीमध्ये कामगार मिळणं खूप अवघड आहे. अमेझॉनमध्ये सुरुवाती वेतन हे 15 डॉलर प्रतितास इतकं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले, चांदीही महागली; वाचा आजचे दर मागील आठवड्यातच अमेझॉनने घोषणा केली होती की, त्यांना कॉर्पोरेट आणि तांत्रिक कामांसाठी 33,000 कामगारांची गरज आहे. अमेझॉनने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली असून कोरोनाच्या या संकटात अनेकांनी ऑनलाईन किराणा ऑर्डर केल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Lockdown, Money

    पुढील बातम्या