पत्नीने केला होता पतीवर बळजबरीने सेक्सचा आरोप, कोर्टाने स्पष्ट केलं तो बलात्कार नाही!

पत्नीने केला होता पतीवर बळजबरीने सेक्सचा आरोप, कोर्टाने स्पष्ट केलं तो बलात्कार नाही!

याआधी या महिलेच्या पतीला चोरीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : दिल्ली कोर्टाने एका व्यक्तीची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली आहे. ज्या दिवशी त्याने आपल्या पत्नीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध (physical Relation) ठेवले होते. त्या दिवशी तो महिलेचा पती होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश उमेद सिंह ग्रेवाल यांनी स्पष्ट केलं की, याचिका दाखल करणाऱ्या पत्नीने 5 जुलै 2016 रोजी आपल्या पतीने आपल्या सहमतीशिवाय बळजबरीने बलात्कार केला होता. पण, ज्या दिवशी या महिलेनं तक्रार दाखल केली होती, त्या दिवशी आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीची ती पत्नी होती.

कोर्टाने आपल्या निर्णय देताना असंही सांगितलं की, तक्रारकर्त्या महिलेनं आरोपी व्यक्तीशी 2 नोव्हेंबर 2015 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर या महिलेनं तक्रार दाखल करताना आपल्या पतीने 5 जुलै 2016 रोजी बलात्कार केला होता.

तक्रार करणारी महिला आणि तिचा पती हे दोघेही पंजाब इथं राहणारे आहे. याआधी या महिलेच्या पतीला चोरीच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. यासाठी त्याने तुरूंगात शिक्षाही भोगली होती. तुरूंगातून परतल्यानंतर पत्नीला न सांगता तो दिल्लीला गेला होता.  दिल्लीला गेल्यानंतर त्याने महिलेला आपण आता कोणताही गुन्हा करणार नाही असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर दोघेही एकत्र राहायला लागले. त्यानंतर पतीने आपल्याच पत्नीचे 2 लाख रूपये लंपास केले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.

त्यानंतर या महिलेनं पोलिसांत जाऊन पतीविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार पतीला अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आपण पतीसोबत राहत नसता ना तो वांरवार घरी येत होता आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता. तिच्या या तक्रारीवर कोर्टाने स्पष्ट केलं की, ज्यावेळी पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले त्यावेळी पत्नी असल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 10:13 PM IST

ताज्या बातम्या