वॉशिंग्टन, 24 एप्रिल : अमेरिकेनं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. कारण, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर केला होता. हे अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन आहे. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पण, त्यानंतर देखील पाकिस्तान खोटं बोलत राहिला. भारतानं यासंबंधीचे पुरावे देखील अमेरिकेला दिले. पण, पाकिस्ताननं मात्र आम्ही भारताविरोधात एफ-16चा वापर केलाच नाही. सर्व विमानं सुरक्षित आहेत, असं म्हणणं कायम ठेवलं. मात्र, भारतानं याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. त्यानंतर अमेरिकेनं आता याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. यापूर्वी एका अमेरिकन मॅगझिननं पाकिस्तानकडे सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण, आता मात्र पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येणार आहे.
अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे -पंतप्रधान मोदी
काय आहे प्रकरण
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहिद झाले. यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत बालाकोटमध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त केले. दरम्यान, पाकिस्ताननं देखील एफ-16चा वापर करत भारतावर हल्ला केला. शिवाय, लष्करी तळांवर क्षेपणास्त्रानं हल्ला केला. यावेळी भारतानं पाकिस्ताचं एफ-16 विमान पाडलं. शिवाय, एफ-16 विमानावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे पुरावे देखील भारतानं गोळा करत ते जगासमोर आणले. पण, अद्याप देखील पाकिस्तान आम्ही भारताविरोधात एफ-16चा वापर केला नाही असं आपलं म्हणणं कायम ठेवलं आहे. अमेरिका मात्र या साऱ्या प्रकरणाची चौकशी करणार असून त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येणार आहे.
भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास 200 ते 300 दहशतवादी ठार झाले होते. तसेच दहशतवादी तळांचं मोठं नुकसान देखील झालं होतं.
VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा