मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चीनची दादागिरी थांबवण्यासाठी आर्मीचा मोठा प्लॅन, भारताच्या मदतीसाठी अमेरिकेच्या फौज रवाना

चीनची दादागिरी थांबवण्यासाठी आर्मीचा मोठा प्लॅन, भारताच्या मदतीसाठी अमेरिकेच्या फौज रवाना

अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 52 हजार अमेरिकन सैनिकांपैकी आशियामध्ये 9,500 सैनिक तैनात करणार आहे.

वॉशिंग्टन, 26 जून : भारत-चीन लडाखच्या सीमेवरी तणाव कमी होण्याचं नाव घेत नाही. गलवान खोऱ्यात चीननं नरमाइची भूमिका घेतली असली तरीही आता लडाखच्या डेपसांग भागात पुन्हा एकदा सैन्य आणि शस्त्रास्त्र वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत-चीन सीमारेषेवरील झालेल्या बैठकीतील करार मोडत चीननं पुन्हा एकदा धोका दिला आहे.

चीनची दादागिरीला आळा घालण्यासाठी आता अमेरिका भारताची मदत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आपलं युरोपातील सैन्य आशियामध्ये हलवणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारताला चीनपासून धोका असल्यानं अमेरिकेनं मदतीचा हात पुढे केला आहे.

हे वाचा-सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

त्याची सुरुवात जर्मनीपासून करण्यात येणार आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 52 हजार अमेरिकन सैनिकांपैकी आशियामध्ये 9,500 सैनिक तैनात करणार आहे. पूर्वेकडील लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) चीनने भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याने अमेरिका हे पाऊल उचलत असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी दिली.

चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसमुळे आधीच जगातील देशांकडून चीनवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोनामुळे चीन जगाला चीनचा सामना करावा लागत असतानाच भारत-चीन सीमारेषेवर सुरु असलेल्या संघर्षात आता अमेरिका भारताची मदत करणार आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: America, India china border