...अन्यथा परिणाम गंभीर होतील; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

...अन्यथा परिणाम गंभीर होतील; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 मार्च : अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे. शिवाय, भारतावर आणखी एक जरी दहशतवादी हल्ला झाला तर त्याचे परिणाम हे गंभीर होतील असा इशारा देखील यावेळी अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे. बुधवारी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला सरळ इशारा दिला. यावेळी बोलताना, पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबावर कठोर कारवाई करावी असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे.

तसेच पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यास आणि भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.


'दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार?' मुंबईत राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी


पाकिस्तान एकटा

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, भारतानं दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्र संघात देखील आवाज उठवला होता. त्याला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांनी देखील पाठिंबा दिला होता. पण, चीननं मात्र नकाराधिकार वापरला होता. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना खिळ बसली होती.

वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्ताननं काही दहशतवादी संघटनांवर कारवाई देखील केली. शिवाय, त्यांच्या मालमत्ता देखील जप्त केल्या. पण, त्यावर देखील आता शंका निर्माण होत आहे. भारतानं देखील पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरूवात केली असून पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात कर देखील लावला. सध्या पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडत असून आता अमेरिकेनं देखील गंभीर इशारा दिला आहे.

SPECIAL REPORT: काय आहे समझोता एक्सप्रेस प्रकरण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या