कोरोनाच्या उद्रेकाने पुन्हा हादरली अमेरिका, 24 तासांत आढळले 2 लाख नवे रुग्ण

कोरोनाच्या उद्रेकाने पुन्हा हादरली अमेरिका, 24 तासांत आढळले 2 लाख नवे रुग्ण

अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या ही 10,238,243वर गेली आहे. तर 2,39,588 जणांचा मृत्यू झालाय. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो.

  • Share this:

वॉशिंग्टन 11 नोव्हेंबर: अमेरिकेत कोरोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 2 लाख नवे रुग्ण (Coronavirus cases in America) आढळून आले आहेत. जगभरातल्या देशांमध्ये कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत 2 लाख 1 हजार 961 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1,535 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमधला हा एक उच्चांक असून त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या ही 10,238,243वर गेली आहे. तर 2,39,588 जणांचा मृत्यू झालाय. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही असा आरोप होत आहे. तर आपली सर्वोच्च प्राथमिकता ही कोरोनाला रोखणं असल्याचं जो बायडेन यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी खास टास्क फोर्सही स्थापन केले असून कृती योजना तयार करण्याचं कामही सुरू केलं आहे.

दरम्यान, रशियाचं स्पुतनिक V (Sputnik V) लस कोरोनापासून बचावासाठी 92 टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं आहे. या लशीच्या चाचणीचे अंतरिम निकाल हाती आले असल्याचं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेनं सांगितलं आहे. याच संस्थेतर्फे कोरोना लशीचं जगभरात मार्केटिंग होत आहे.

रशियाने Sputnik V ची 16000 लोकांवर चाचणी केली. या लोकांना लशीचे दोन दोन डोस देण्यात आले होते.या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.

मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. "रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही.रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही. "रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 7:09 PM IST

ताज्या बातम्या