अमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'

अमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती'

अमेरिकेत पुलाव आणि दाल तडका हे अस्सल भारतीय पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज कीर्ती श्रीखंडे इंग्रजीमधून समजावून सांगतात.

  • Share this:

केतकी जोशी, मुंबई, 21 नोव्हेंबर : परदेशात गेल्यानंतर अनेक मुलींना आपलं अस्तित्व हरवल्यासारखं होतं. पण अशावेळेस निराश न होता आपल्यातलं सामर्थ्य ओळखलं तर परदेशातही आपली ओळख निर्माण होते. हेच दाखवून दिलंय फिलाडेल्फियाच्या कीर्ती श्रीखंडे यांनी. त्यांच्या सुगरणपणाला वाव मिळाला आणि म्हणूनच फिलाडेल्फियाच्या नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटमध्ये त्यांना भारतीय पदार्थांच्या सादरीकरणासाठी बोलावण्यात आलं.

अमेरिकेत पुलाव आणि दाल तडका हे अस्सल भारतीय पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज कीर्ती श्रीखंडे इंग्रजीमधून समजावून सांगतात. सध्या कीर्ती श्रीखंडे अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामध्ये राहतात. फूड ब्लॉगर आणि भारतीय पदार्थ परदेशामध्ये लोकप्रिय करणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली आणि अगदी मध्यमवर्गातून आलेल्या किर्तीताईंसाठी हा प्रवास सोपा नव्हता.

पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातल्या कीर्ती श्रीखंडे फिलाडेल्फिया इथं 2009 साली शिफ्ट झाल्या. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सगळंच नवीन होतं. सुरुवातीला व्हिसाच्या अडचणींमुळे त्या लगेचच नोकरी करू शकत नव्हत्या. अगदी 2013 सालापर्यंत त्या नोकरी करू शकल्या नाहीत. पण त्यांनी हार मानली नाही. हाताला असलेली चव आणि स्वयंपाक करण्याची आवड यामुळे त्यांनी घरबसल्या विविध पदार्थ करायला सुरुवात केली. त्यांनी नवीन रेसिपीज शोधून काढल्या, केल्याही आणि स्वत:चा फूडब्लॉग लिहायलाही सुरुवात केली.

हे सगळं पोचलं फिलाडेल्फियाच्या 125 वर्ष जुन्या अशा प्रसिद्ध रिडींग टर्मिनल मार्केटमध्ये. तेथे कीर्तीताईंना आमंत्रित करण्यात आलं. तिथे त्यांनी अमेरिकन लोकांसमोर आपले दाल तडका आणि व्हेज पुलाव हे दोन भारतीय पदार्थ करून दाखवले. खरंतर आपल्यासाठी हे अगदी साधे पदार्थ आहेत. त्यात काय एवढं असंही कोणाला वाटेल. पण तूर डाळ किंवा हिंग असे पदार्थ अजिबात माहिती नसलेल्या गर्दीसमोर हे पदार्थ करून दाखवणं, त्यांना समजावणं हे खरोखर आव्हानात्मक होतं. पण कीर्ती श्रीखंडे यांनी हे आव्हान अगदी सहज पेललं. आणि दादही मिळवली.

परदेशात गेल्यानंतर व्हिसा किंवा अन्य अडचणींमुळे अनेक मुलींना काम करता येत नाही. पण त्यामुळे निराश न होता, आपल्या कलागुणांना वाव देणं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करणं हे कीर्तीताईंनी करून दाखवलं.

 VIDEO: फ्लाईट हुकली म्हणून महिलेने रनवेवर केला विमानाचा पाठलाग

First published: November 21, 2018, 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading