Home /News /news /

कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

अमेरिकेत अतिशय वाईट स्थिती असून गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 4000 हजार जणांचा मृत्यू झाला.

    वॉशिंग्टन 09 एप्रिल : सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. 200 पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे. अनेक दिग्गज कंपन्या आपली सगळी कामं बाजूला सारून फक्त कोरोनावर औषध शोधण्याचं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले, कोरोनाविरुद्ध विविध कंपन्यांनी 10 औषधं तयार केली आहेत. त्या लसींच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. अतिशय वेगात यावर काम सुरू असून शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि प्रशासन त्यावर युद्धपातळीवर काम करत आहे. लकरच यश मिळेल असंही  ते म्हणाले. अमेरिकेत अतिशय वाईट स्थिती असून गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 4000 हजार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत 4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण असून 14 हजार 700 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा भडका, एका दिवसात 63 कोरोना पॉझिटिव्ह संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत आहे. या कठीण काळात भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श  उदाहरण म्हणून समोर आला आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची अमेरिकेत (America) निर्यात करण्याला मान्यता दिली आहे. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘थँक्स इंडिया’ असं ट्विटर म्हटलं होतं. अमेरिकेने आभार व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं जात आहे. हे वाचा - लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये मांस खरेदीला वेग, अमेरिकेकडून बाजार बंद करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटरवर लिहिलं की, 'अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अशा वेळी मित्र आणखी जवळ येतात. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि मानवतेला मदत करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. कोविड -19 विरोधातील लढा आपण मिळून जिंकू. (संपादन - अजय कौटिकवार)
    First published:

    पुढील बातम्या