मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /क्या बात है! वयाच्या 71 व्या वर्षी 234 किलो वजन उचलून केले 4 वर्ल्ड रेकॉर्ड

क्या बात है! वयाच्या 71 व्या वर्षी 234 किलो वजन उचलून केले 4 वर्ल्ड रेकॉर्ड

तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 71 वर्षांच्या व्यक्तीनं केलेला या रेकॉर्डचा VIDEO तर पाहा.

तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 71 वर्षांच्या व्यक्तीनं केलेला या रेकॉर्डचा VIDEO तर पाहा.

तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 71 वर्षांच्या व्यक्तीनं केलेला या रेकॉर्डचा VIDEO तर पाहा.

  वॉशिंग्टन,06 जानेवारी : संगीत शारदा नाटकातल्या म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान या पदाची आज आठवण झाली. का विचारताय? मग ऐका. अमेरिकेतील सॅन डिएगोमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या यूएसपीए नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशीपमध्ये रुडी कानडल्ब या 71 वर्षांच्या ज्येष्ठाने वेटलिफ्टिंगमध्ये 234 किलो वजन उचलून एका दिवसात चार विश्वविक्रम केले. चकित झालात ना तुम्हीही. हो ही बातमी खरी आहे आणि तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. कोरोनामुळे तंदुरुस्तीची किंमत कळालेल्या जगासमोर या आजोबांनी एक नवाच आदर्श उभा केला आहे. त्यांना हे गाणं लागू होतंच म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान. रुडी यांनी यूएसपीए नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशीपमध्ये स्क्वॉट प्रकारात 195 किलो आणि बेंच प्रेस प्रकारात 303 किलो वजन उचललं. रूडी यांनी इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली.

  त्यांनी या स्पर्धेतील व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आणि कॅप्शन लिहिली ‘ सॅन डिएगोमध्ये झालेल्या यूएसपीए ड्रग-टेस्टेड नॉर्थ अमेरिकन चम्पियनशीप्समध्ये माझा आजचा दिवस उत्तम गेला. मी माझे प्रशिक्षक आणि ट्रेनिंग पार्टनर यांना धन्यवाद देतो.’ रूडी यांच्या या फोटो आणि पोस्टवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकजण रुडी यांना हिरो म्हणत आहेत. 71 व्या वर्षी त्यांची चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी याचं प्रचंड कौतुक होत आहे आणि अनेक नेटिझन्सनी त्यांना या तंदुरुस्तीचं गुपित काय आहे असंही विचारलं आहे. इंटरनॅशनल पॉवरलिफ्टिंग लीगनुसार रूडी यांनी एका दिवसात डेडलिफ्टिंग प्रकारात 567 किलो वजन उचलून त्यांच्या वजनी गटात चौथा विक्रम केला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Rudy Kadlub (@rudykadlub)

  रुडी 55 वर्षांचे असताना त्यांनी शरीरसौष्ठव राखायला सुरुवात केली आणि प्रचंड मेहनत घेऊन ते प्रोफेशनल पॉवरलिफ्टर झाले. 71 व्या वर्षात त्यांनी अनेक विजेतीपदं नोंदवली असून रेकॉर्डही आपल्या नोंदवले आहेत. रॉरी व्हॅन उल्फ या वंडर किड डिसेंबर 2020 स्ट्राँगेस्ट 7 इयर किड ठरली. कॅनडातील रॉरी ही तिसरीत असून तिने स्नॅचमध्ये 32 आणि जर्कमध्ये 42 किलो असं एकूण 80 किलो वजन उचलून हा किताब पटकावला. डेडलिफ्टिंगमध्ये सामान्यपणे हे प्रौढ जिमनॅस्ट आणि शक्तिशाली लोकांचा सहभाग असतो. रॉरी स्क्वॅटमध्येही 61 किलो वजन उचलू शकते.

  बातम्यांनुसार रॉरीने पाचव्यावर्षीपासून वेट ट्रेनिंग सुरू केलं. रॉरीला यूएसए वेटलिफ्टिंग अंडर 11 आणि अंडर 13 युथ नॅशनल चॅँपियन ही विजेतीपदं डिसेंबरमध्ये मिळाली होती. ती 30 किलो गटात खेळते. अत्यंत कडक डाएट आणि ट्रेनिंगमुळे तिला यश मिळाले असं तिच्या वडिलांनी सांगितलं पण तिच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक डॉक्टर नियुक्त करण्यात आला आहे. रॉरी स्वत: जिमनॅस्ट समजते आणि ती आठवड्यात नऊ तासांचं वेट ट्रेनिंग घेते त्यात 4 तास डेडलिफ्टिंग असतं असंही वडिलांनी सांगितलं.

  First published: