रामीबाईंनी काबाडकष्ट करून मुलाला मोठं केलं, मुलाने त्यांना रस्त्यावर आणलं!

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हटलं जातं. मात्र आयुष्यभर खस्ता खाल्यानंतर अनेक वृद्धांच्या आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येते.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2018 08:29 AM IST

रामीबाईंनी काबाडकष्ट करून मुलाला मोठं केलं, मुलाने त्यांना रस्त्यावर आणलं!

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ, 27 ऑक्टोबर : म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हटलं जातं. मात्र आयुष्यभर खस्ता  खाल्यानंतर अनेक वृद्धांच्या आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येते. पोटच्या मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर अनेकांना फुटपाथ, रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी आपलं उरलं सुरलेलं आयुष्य व्यतित करावं  लागतं. मात्र अंबरनाथमध्ये एक असं केंद्र उभं राहिलय. ज्यात या बेघर वृद्धांना निवारा मिळला आहे.

७१ वर्षांच्या रामीबाईचं बोलणं ऐकल्यावर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. पोटच्या मुलाला काबाडकष्ट करून लहानाचं मोठं केलं. त्यानंच घराबाहेर काढल्यानं रामीबाईना या उतारवयात आता कुठं जायचं हा प्रश्न पडला. अनेक दिवस रेल्वे स्थानकं, रस्त्याच्या कडेला कसेबसे दिवस काढल्यानंतर त्यांना या बेघरांसाठी उभारलेल्या घरात निवारा मिळाला.

फक्त रामीबाईच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक निराधार वृद्ध महिलांसाठी हे केंद्र हक्काचा निवारा बनलं आहे. आपली मुलं आणि सुन आपल्याला संभाळत नाही. त्यांच्यामडून मारहाण केली जाते असं या वृद्धाश्रमातल्या काशिबाई पिचाड यांनी सांगितलं. त्यांच्या या व्यथा ऐकल्या की कान पण बधिर व्हायला होतात पण हे करताना त्यांच्या मुलांचं धाडस कसं झालं हा प्रश्न पडतो.

केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत अंबरनाथ पालिकेनं सिद्धांत समाजविकास संस्थेला हा बेघर निवारा चालवण्याचं काम दिलं. कुटुंबाचं सुख नसलेल्या या वृद्ध महिलांना आयुष्याच्या उतारवयात एकत्र राहण्यात समाधान मिळतं आहे.

Loading...

इथं या महिलांना दोन वेळेचा नाश्ता, दोन वेळचं जेवणं, झोपण्यासाठी पलंग आणि मनोरंजनासाठी टीव्ही, वर्तमानपत्रं अशा सगळ्या गोष्टी आहेत. इथल्या छोट्याशा बागेत या आज्या संध्याकाळी फेरफटकाही मारतात. सिद्धांत सामाजिक संस्थेचे कर्मचारी या  सगळ्यांची अगदी आपल्या आजींप्रमाणेच काळजी घेतात.

या निवारा केंद्रामुळे या निराधार आज्यांना तर आधार मिळालाय. पण असे निवारा केंद्र काढावी लागत आहेत हीच खरं तर शरमेची गोष्ट आहे.

VIDEO: 'त्याने मला मागून उचललं आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2018 08:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...