S M L

अंबरनाथ गणेश दिनकर हत्येप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत

आरोपी संजय नरवडे याने जुलै महिन्यात अंबरनाथच्या लोकनगरी भागातही एका प्रेमीयुगुलाला लुटत प्रियकराच्या हातावर गोळीबार केल्याचं तपासात समोर आलंय

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2018 08:00 AM IST

अंबरनाथ गणेश दिनकर हत्येप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत

12 मार्च : अंबरनाथमधील नालिंबीच्या डोंगराळ भागात मागील आठवड्यात प्रेयसीवर बलात्कार करून प्रियकराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेनं संजय नरवडे या आरोपीला उल्हासनगरमधून अटक केलीये.

अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नाळिंबी गावात 5 मार्च रोजी डोंगराळ भागात गणेश दिनकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर गणेश दिनकरच्या प्रेयसीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे स्केच जारी केले होते. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी संजय नरवडेला अटक केली. मूळचा जालन्याचा असलेला संजय उल्हासनगरात रिक्षाचालक म्हणून काम करतो.

काय घडलं त्या दिवशी ?



गणेश आपल्या प्रेयसीबरोबर नालिंबी भागात फिरायला आला होता. यावेळी चोरीच्या उद्देशानं संजय नरवडेनं या दोघांना अडवलं. पैशाच्या हव्यासापोटी संजय नरवडे यानं गणेशवर पिस्तुल रोखत त्याच्याकडे पैसे आणि गाडीची चावी मागितली, मात्र गणेशने प्रतिकार केल्यामुळे संजयने त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या, ज्यात गणेशचा मृत्यू झाला. यानंतर संजयनं गणेशच्या प्रेयसीवर बलात्कारही केला. या सगळ्याची आरोपी संजय नरवडेने कबूली दिली.आज त्याला कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, आरोपी संजय नरवडे याने जुलै महिन्यात अंबरनाथच्या लोकनगरी भागातही एका प्रेमीयुगुलाला लुटत प्रियकराच्या हातावर गोळीबार केल्याचं तपासात समोर आलंय. त्याच्याकडे असलेलं पिस्तुल त्याच्याकडे कसे आले आणि त्याने या आधी किती गुन्हे केलेत हे पोलीस तपासात समोर येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 08:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close