पिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला

पिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला

  • Share this:

अंबरनाथ, ता. 28 जुलै : अंबरनाथच्या चिखलोली धरणात एक युवक बुडाल्याची घटना रविवारी घडली. सुटीचा दिवस असल्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी या धरणावर आला होता. धरणात बुडालेल्या या युवकाचे अडनाव घाग असे असून, तो कल्याणचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. धरण पात्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली असतानाही त्याचा अतिउत्सार त्याच्याच जीवावर बेतला. बुडालेल्य युवकाला शोधण्यासाठी धरणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंबरनाथचे चिखलोली धरण हे १०० टक्के भरले आहे. अंबरनाथ लगतच्या हाजीमलंग डोंगरातील पावसाचे पाणी चिखलोली धरणात अडवले जाते. या धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ओढ्यावर भिजणाऱ्या पर्यटकांची कायम गर्दी असते. मुसळधार झालेल्या पावसामुळे हे धरण भरून वाहू लागले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना धरण पात्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे, मात्र, रोकटोक करणारे कुणीच नसल्याने धरणाच्या पात्रात उतरण्याचा मोह अनेकदा पर्यटकांना नडतो.

शोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार

अशीच एक घटना रविवारी दुपारी याठिकाणी घडली. कल्याणचे काही उत्साही मित्र याठिकाणी पिकनिकसाठी आले होते. धरणातून वाहणाऱ्या ओढ्यावर भिजत असताना त्यापैकी एक जण धरणाच्या पात्रात उतरला. पण पोहता येत नसल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडल्याने तो धरणात बुडाला. घाग असे बुडालेल्या युवकाचे अडनाव सांगण्यात येत आहे. तरुणाला शोधण्यासाठी धरणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा..

आता आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलनं : मराठा संघटनांचा एल्गार

एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

चक्क पशु वैद्यकीय दवाखान्यात दारू आणि मटणाची पार्टी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 06:48 PM IST

ताज्या बातम्या