BREAKING: वारकऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात

BREAKING: वारकऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे घरी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

शैलेश पालकर, प्रतिनिधी

पोलादपुर, 09 नोव्हेंबर : पोलादपुर -आंबेनळी घाटातील दापोली कोकण कृषी विद्यापीठ बस अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघातामध्ये 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. या अपघातानंतर या घाटात अनेक अपघात झाले. असाच एक भीषण अपघात वारकऱ्यांच्या मिनी बसला झाला आहे. पोलादपूर तालुक्‍यातील आंबेनळी घाटामध्ये असलेल्या आड ते कुंभळवणे गावाच्या तीव्रवळण उतारावरील घाट रस्त्यावर वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक मिनी बस आंब्याच्या झाडावर धडकली आणि पंढरपूर येथून परतणारे 19 वारकरी जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या दिवाण खवटी गावातील 19 वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे निघाले. यावेळी पोलादपूरनजिक आंबेनळी घाटातून त्यांची मिनी बस पोलादपूर तालुक्यातील आड कुंभळवणे गावादरम्यान तीव्र वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.  या भीषण अपघातामध्ये 19 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर नितेश सावंतसह चारजणांना पुढील ऊपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस प्रशासन बचावासाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलीस आता अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या आंबेनळी घाटामध्ये अनेक धक्कादायक अपघात झाले आहेत. 31 ऑक्टोबरलादेखील अक्कलकोट-महाड एसटी बस दरीत कोसळून अपघात घडला होता. मात्र, यावेळी सुदैवाने एका आंब्याच्या झाडाला ही बस अडकल्याने मोठया प्रमाणावरील मनुष्यहानी टळली. या अपघातामध्ये बसचालकासह 21 प्रवासी जखमी झाले होते. जखमींवर महाडमधील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

इतर बातम्या - 'संजय राऊतांना टीव्ही द्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कॅडबरी चॉकलेट द्या

वरंध घाट पावसाळयात रस्ता खचल्याने बंद झाला त्यामुळे आंबेनळी घाट हा एकमेव पर्याय असल्यानं त्या सत्यानं बसची वाहतूक होते. अक्कलकोट-महाड बस दुर्घटनेत 27 प्रवाशांसह बस चालक जखमी झाले होते. एसटी चालक एन.पी. खरात यांची प्रकृती गंभीर होती. किरकोळ जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

28 जुलै 2018 ला पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला होता. या अपघातात 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी 5 महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी दापोलीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.  प्रशांत भांबेड यांच्यावर पोलादपूर पोलिसात दाखल गुन्हा झाल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

इतर बातम्या - राजकारणात नवं ट्विस्ट, मोठा पक्ष म्हणून भाजपला मिळू शकते सरकार स्थापनेची संधी!

प्रशांत भांबेड यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, या अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. तसंच प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. प्रशांतवरील गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार होतं, असंही या बैठकीत ठरलं होतं.

इतर बातम्या - कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आलेल्या 60 भाविकांना विषबाधा

नेमकं काय घडलं होतं?

28 जुलै रोजी सकाळी साडे 10 च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील 29 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणा-या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली.

मात्र, नंतर हेच प्रकाश सावंत संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. कारण मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश सावंत हेच गाडी चालवत होते आणि अपघात होताना त्यांना लक्षात आले असता त्यांनी गाडीतून उडी टाकली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. इतर बातम्या -

इतर बातम्या - क्षणात बाप-लेकराच्या आयुष्याला पुर्नविऱ्हाम, पोहताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू

First Published: Nov 9, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading