S M L

VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली

Updated On: Jul 28, 2018 05:36 PM IST

VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'

रायगड, 28 जुलै : पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूतांडवातून कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश सावंत देसाई हे नशीब बलवत्तर होते म्हणून बचावले. दरीत बस कोसळ्यानंतर ते कसे बाहेर आले त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय.

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले.

VIDEO : 'ज्या' ठिकाणी घडला बसला अपघात तेथील दृश्य

घाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.

बस दरीत कोसळण्याआधी काय घडलं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

Bus Accident Update : ट्रेकर्सच्या मदतीने मृतांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close