आंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर

याआधीही या संपूर्ण घटनेची वरीष्ठ पातळींवर उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 07:35 PM IST

आंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर

दापोली, 29 आॅगस्ट : आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत बचावलेले अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधात मृतांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठावर मोर्चा काढला. प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी आणि सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली. नातेकाईकांचा आक्रोश पाहुन चौकशी सुरू होईपर्यंत प्रकाश सावंत यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.

हेही वाचा - आंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

आज बस दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि नातेवाईक प्रकाश सावंत यांना 'फाशी द्या फाशी द्या' अशा घोषणा देत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. आंबेनळी घाटातील हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. तसंच देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीये.

Loading...

आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मृतांच्या नातेवाईकांनी दापोली कृषी विद्यापीठावर धडक मोर्चात सहभागी झाले होते. प्रकाश सावंत देसाईला बडतर्फ करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी दापोली राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेना भांडुप आमदार अशोक पाटील, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून कोकण कृषी विद्यापीठाने चौकशी सुरू असेपर्यंत प्रकाश सावंत देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश कुलगुरू तपस भट्टाचार्य यांनी काढला आहे.

याआधीही या संपूर्ण घटनेची वरीष्ठ पातळींवर उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय. तसंच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केलीये.

मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल प्रश्न

बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?

ते नेमके कुठे बसले होते?

ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?

शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?

प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?

---------------------

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...