तब्बल 5 महिन्यांनतर आंबेनळी घाट अपघाताला वेगळं वळण

तब्बल 5 महिन्यांनतर आंबेनळी घाट अपघाताला वेगळं वळण

आंबेनळी घाट अपघात प्रकरणात पोलिसांनी वाहन चालक प्रशांत भांबिडवर नोंदवलेला गुन्हा त्याच्या कुटुंबीयांना अमान्य केला आहे. 'आपला मुलगा अस करूच शकत नाही.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 08 डिसेंबर : आंबेनळी घाट अपघात प्रकरणात पोलिसांनी वाहन चालक प्रशांत भांबिडवर नोंदवलेला गुन्हा त्याच्या कुटुंबीयांना अमान्य केला आहे. 'आपला मुलगा अस करूच शकत नाही. पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी गुन्हा नोंदवला आहे. प्रशांतवर गुन्हा नोंदवून आमच्या कुटुंबावर पोलिसांनी अन्याय केला आहे.' असा मृत चालक प्रशांत भांबिडेचे वडिल प्रदीप भांबिड यांनी केला आहे.

आंबेनळी अपघातात बचावलेले सावंत देसाईच दोषी असल्याचा आमचा संशय आहे. त्याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. आधीपासूनच सावंत देसाई यांच्यावर सगळ्यांचा संशय आहे, असं असताना पोलिसांनी तब्बल 5 महिन्यांनतर मृत चालकावर गुन्हा नोदवल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा कलाटनी घेतली आहे.

२८ जुलै २०१८ ला पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला त्या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी 5 महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस चालक प्रशांत भांबेड हा  त्याच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होता. असा आरोप ठेवून त्यांच्यावर निष्काळजीपणाने आणि रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलादपूर पोलिसांत गुन्हात दाखल करण्यात आला आहे.

आंबेनळी अपघातामध्ये कोणाचातरी मोठा हात असण्याची शक्यता आहे. हा अपघात नसून घातपात आहे. 30 कर्मचाऱ्यांना संपण्याचा हा डाव होता. असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

आंबेनळी घाटातील बस अपघात हा घातपात होता असा संशय आहे. त्यात पोलीस योग्य दिशेने तपास करत नाही आहेत. तपास योग्य दिशेने झाल्यास सत्य बाहेर येईल असंदेखील मृतांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आंबेनळी अपघात प्रकरणाने पुन्हा एकदं वेगळं वळण घेतलं असून यातील सत्य बाहेर येणार की नाही हेच पाहावे लागेल.

VIDEO : शिरूर मधून हारलो तर पवारांची औलाद सांगणार नाही -अजित पवार

First published: January 8, 2019, 7:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading