S M L

'मी वाचलो,पण आता मलाच त्रास होतोय'

पण या घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत

Updated On: Aug 6, 2018 08:51 PM IST

'मी वाचलो,पण आता मलाच त्रास होतोय'

रत्नागिरी, 06 आॅगस्ट : आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या असतानाच या घटनेचे एकमेव साक्षीदार प्रकाश सावंत देसाई यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत. पण यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतोय अशी तक्रार सावंत यांनी केलीये.

२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.

सहलीला गेलेल्या दापोली कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्युनं खळबळ उडाली. 31 जणांपैकी 30 जणांचा जागीच मृत्यू होतो आणि एक इसम कसा वाचू शकतो?  असा आरोप करुन कुटुंबियांनी प्रकाश सावंताच्या बचावण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल प्रश्न

बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?

Loading...

ते नेमके कुठे बसले होते?

ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?

शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?

प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?

अशा प्रकारचे अनेक प्रश्न मृतांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेत. या संपूर्ण घटनेची वरीष्ठ पातळींवर उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय. तसंच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केलीये.

खरं तर हे आरोप होण्याआधीच पोलिसांनी प्रकाश सावंत यांच्या आश्चर्यकारक रितीने बचावण्यावरच चर्चा केली होती. आणि त्यानंतर प्रकाश सावंत देसाईंचा पुन्हा जबाब घेणार असं त्यांना कळवलंही. त्यामुळे कदाचित त्या अपघाताचं आणि मृत्युचं रहस्य उलगडु शकेल असा पोलिसांना अंदाज आहे.

पण या घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत. मात्र त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्समध्ये तफावत आढळुन येत आहे.  पोलीस अपघाताशी त्यांचाच काही संबंध असल्याचंही तपासात असल्यानं चौकशी करत आहे. पण त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचं प्रकाश सावंत देसाई यांनी सांगितलंय.

देसाई काय म्हणाले होते ?

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. घाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.

बस दरीत कोसळण्याआधी काय घडलं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

संबंधीत बातम्या

VIDEO :'आंबेनळी घाटात बस कोसळली कशी ?,सीआयडी चौकशी करा'

आंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे ? तपास चक्र सुरू

शोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार

VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला

PHOTOS : आंबेनळी घाट, मृतदेह आणि बचावकार्य

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 08:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close