Ambati Rayudu: धक्कादायक! क्रिकेटपटू अंबाती रायडूची निवृत्ती, IPLही खेळणार नाही

Ambati Rayudu Announces Retirement: वर्ल्ड कपमध्ये राखीव फलंदाज म्हणून संघात असूनही रायडूला संघात स्थान दिले नव्हते.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:10 PM IST

Ambati Rayudu: धक्कादायक! क्रिकेटपटू अंबाती रायडूची निवृत्ती, IPLही खेळणार नाही

मुंबई, 03 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये राखीव फलंदाज म्हणून अंबाती रायडूची संघात निवड करण्यात आली होती. मात्र शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. दरम्यान आज रायडूनं सर्व क्रिकेटच्या फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूनं बीसीसीआयच्या सर्व फॉरमॅटमधून आणि आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान याचे कारण त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली नाही त्यामुळं त्यानं हा निर्णय घेतला, अशी शक्यता चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

वर्ल्ड कपकरिता भारतीय संघाची घोषणा होत असताना अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते. आता विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर राखीव ठेवण्यात आलेल्या रायडूला नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. यावर नेटकरी बीसीसीआय चांगलेच भडकले होते. आतापर्यंत 55 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 55 सामन्यात 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. रायडूनं आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

गेल्या वर्षी रायडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 33 वर्षीय रायडूनं आता आपल्या 17 वर्षीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 2013 साली एकदिवसीय क्रिकेटमधून पदार्पण करणाऱ्या रायडूनं शेवटचा सामना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. तर रायडू चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून आयपीएल खेळतो. मात्र आता त्यानं इतर क्रिकेट फॉर्मबरोबरच आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे.

Loading...

दोन खेळाडू जखमी पण रायडूला नाही मिळाली संधी

शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर पडला होता. त्यावेळी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर विजय शंकर जखमी झाल्यानंतर रायडूला संधी देण्यात आली नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. मयंकनं आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

वाचा- World Cup : टीम इंडियाचं सेमीफायनल चॅलेंज, भिडणार 'या' संघाशी

वाचा- टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! 'या' चार संघांच्या स्वप्नांचा केला चुराडा

वाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...