ईशा आणि आनंदच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबीयांची 'अन्नसेवा'

News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2018 11:55 PM IST

ईशा आणि आनंदच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबीयांची 'अन्नसेवा'

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहा सोहळा राजस्थानमधल्या उदयपूर इथं 8 आणि 9 तारखेला होणार आहे. त्या निमित्त सर्व अंबानी आणि पिरामल कुटुंबीय देखण्या उदयपूर शहरात दाखल झालेत. या विवाह सोहळ्यानिमित्त अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांकडून खास अन्नसेवा केली जाणार आहे.

ईशाअंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहा सोहळा राजस्थानमधल्या उदयपूर इथं 8 आणि 9 तारखेला होणार आहे. त्या निमित्त सर्व अंबानी आणि पिरामल कुटुंबीय देखण्या उदयपूर शहरात दाखल झालेत. या विवाह सोहळ्यानिमित्त अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांकडून खास अन्नसेवा केली जाणार आहे.

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहानिमित्त उदयपूर इथल्या श्री नारायण सेवा संस्थान मधल्या गरजूसाठी चार दिवस अन्न सेवा केली जाणार आहे. यात 7 ते 10 डिसेंबर या काळात संस्थेतल्या आश्रमात असणाऱ्या 5 हजार 100 जणांना 4 दिवस दिवसातून तीन वेळा सुग्रास जेवण दिलं जाणार आहे.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहानिमित्त उदयपूर इथल्या श्री नारायण सेवा संस्थान मधल्या गरजूसाठी चार दिवस अन्न सेवा केली जाणार आहे. यात 7 ते 10 डिसेंबर या काळात संस्थेतल्या आश्रमात असणाऱ्या 5 हजार 100 जणांना 4 दिवस दिवसातून तीन वेळा सुग्रास जेवण दिलं जाणार आहे.

Loading...

शुक्रवारी या अन्नसेवेची सुरुवात झाली. यावेळी मुकेश आणि नीता अंबानी, अजय आणि स्वाती पिरामल, त्याच बरोबर इशा आणि आनंद यांनी स्वत: मुलांना जेवण वाढत सेवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. अनंत आणि आकाश अंबानीही यावेळी उपस्थित होते.

शुक्रवारी या अन्नसेवेची सुरुवात झाली. यावेळी मुकेश आणि नीता अंबानी, अजय आणि स्वाती पिरामल, त्याच बरोबर ईशा आणि आनंद यांनी स्वत: मुलांना जेवण वाढत सेवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. अनंत आणि आकाश अंबानीही यावेळी उपस्थित होते.

विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उदयपूरमध्ये 'स्वदेशी बाजार'चाही शुभारंभ करण्यात आला. या 'स्वदेशी बाजारा'त देशभरातल्या कलात्मक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. यात हस्तकला, 30 प्रकारच्या विविध साड्या आणि इतर कपड्यांचे प्रकार, वारली, मधुबनी या सारखे दुर्मिळ होत जाणारे कलाकुसरीच्या वस्तूही ठेवल्या जाणार आहेत. हस्तकलेला प्रोत्साहन देणं, कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करुन देणं आणि भारतीय कलेला जगभर पोहोचविणं हा या उपक्रमाचा उद्देश असून रिलायन्स फाऊंडेशन या उपक्रमाला मदत करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 11:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...