मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डोअरबेल वापरताना काळजी घ्या, नाही तर होईल मोठं नुकसान

डोअरबेल वापरताना काळजी घ्या, नाही तर होईल मोठं नुकसान

तुमच्या आमच्या सर्वांच्या घराच्या दरवाजावर डोअरबेल (doorbell) असते. डोअरबेल असणं ही सामान्य गोष्ट आहे. पण याच डोअरबेलमुळे कुणाला काही कोटींचा दंड भरावा लागला असेल तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोअरबेलमुळे कुणाला कसा दंड होईल? हो... पण असं झालं आहे.

तुमच्या आमच्या सर्वांच्या घराच्या दरवाजावर डोअरबेल (doorbell) असते. डोअरबेल असणं ही सामान्य गोष्ट आहे. पण याच डोअरबेलमुळे कुणाला काही कोटींचा दंड भरावा लागला असेल तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोअरबेलमुळे कुणाला कसा दंड होईल? हो... पण असं झालं आहे.

तुमच्या आमच्या सर्वांच्या घराच्या दरवाजावर डोअरबेल (doorbell) असते. डोअरबेल असणं ही सामान्य गोष्ट आहे. पण याच डोअरबेलमुळे कुणाला काही कोटींचा दंड भरावा लागला असेल तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोअरबेलमुळे कुणाला कसा दंड होईल? हो... पण असं झालं आहे.

पुढे वाचा ...

    नदी दिल्ली ,14 ऑक्टोबर :  तुमच्या आमच्या सर्वांच्या घराच्या दरवाजावर डोअरबेल (doorbell) असते. डोअरबेल असणं ही सामान्य गोष्ट आहे. पण याच डोअरबेलमुळे कुणाला काही कोटींचा दंड भरावा लागला असेल तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोअरबेलमुळे कुणाला कसा दंड होईल? हो... पण असं झालं आहे.

    इंग्लंडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या डोअरबेलमुळं इतकं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे की ते ऐकल्यावर तुम्हीही हादराल. त्या माणसाच्या शेजाऱ्याने दरवाजाच्या बेलवर आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने तक्रारदाराचं म्हणणं मान्य केलं आणि बेल बसवणाऱ्या व्यक्तीला तब्बल एक लाख पौंडाचा (एक कोटी रुपये) दंड ( fine) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचं वृत्त झी न्यूज हिंदी नं दिलं आहे.

    ऑक्सफर्डशायरमधील (Oxfordshire) इंग्लिश काउंटीमध्ये ( County) राहणाऱ्या 45 वर्षीय जॉन वुडर्ड यांच्याविरोधात त्यांच्या शेजारी डॉ. मेरी फेयरहर्स्ट यांनी कोर्टात धाव घेतली होती. जॉन वुडर्ड यांनी दरवाजावर लावलेल्या बेलमुळं आपल्या गोपनीयतेचं उल्लंघन होत असून हा आपला छळ होत असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. कोर्टाने वुडर्डची बेल त्यांच्या शेजाऱ्याची गोपनीयतेचा भंग आणि छळ करणारी असल्याचं मान्य केलं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने वुडर्ड यांना याबद्दल विचारणा केली. न्यायालय फेयरहर्स्ट यांना ही नुकसान भरपाई देण्यात यावी असा आदेश देऊ शकतं असं ‘द सन’ ने म्हटलं आहे.

    जॉन वुडर्ड यांनी 2019 मध्ये कार चोरीच्या घटनेनंतर एक खास बेल लावली होती. मात्र हीच बेल त्याच्यासाठी एक समस्या बनली. जॉन वुडर्डच्या घराच्या मुख्य दरवाजावरील बेलमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवण्यात आला आहे. त्यामुळे ते घराबाहेर नजर ठेवू शकतात आणि घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करू शकतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. मेरी फेअरहर्स्टने डोअरबेलला तिच्या गोपनीयतेचा भंग असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, मी प्रत्येक क्षणी कॅमेरा बेलमुळे मी वुडर्डच्या निरीक्षणाखाली असून याचा आपल्याला त्रास होत आहे.

    शेजारी जॉन वुडर्डकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा त्याने वाईट वागणूक दिली. वुडर्डने याकडं दुर्लक्ष करून दरवाजाची बेल काढण्यास स्पष्टपणे नकार दिला. अशा परिस्थितीत कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं मेरी फेअरहर्स्टने कोर्टाला सांगितलं. न्यायाधीश मेलिसा क्लार्कने सुनावणीवेळी, वुडर्डने 2018 च्या डेटा संरक्षण कायद्याचं तसंच सामान्य डेटा संरक्षण नियमाचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं.

    एखाद्याला डोअरबेल लावल्यामुळे मोठा दंड ठोठावण्याची इंग्लंडच्या इतिहासातीलही कदाचित पहिलीच घटना असेल. जॉन वुडर्डने ही घंटा अॅमेझॉनकडून खरेदी केली होती. या डोअरबेलचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, जेणेकरून कोणाच्याही गोपनीयतेवर परिणाम होणार नाही, असं अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांना सूचित केलं आहे.

    First published:

    Tags: Viral news