अॅमेझॉन पुन्हा अडचणीत; भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळला

अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 9, 2017 12:42 PM IST

अॅमेझॉन पुन्हा अडचणीत; भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळला

09 मे : अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे. तसंच, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका केली आहे.

Loading...

भारतीय राष्ट्रध्वज आणि नकाशाबाबतची चुकीची माहिती पसवणाऱ्या अॅमेझॉनने तातडीने सर्व  स्टिकर्स वेबसाईटवरुन काढून टाकावीत, अशी मागणी बग्गा यांनी केली आहे.  वेबसाईटवर उपलब्ध असलेले वॉल डेकोरेशन स्टिकरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे, याविरधोत बग्गा यांनी आवाज उठवला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाईटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याची तक्रार एका भारतीय नागरिकाने केली होती.  यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कडक इशाऱ्यानंतर अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने स्वराज यांना पत्र लिहून माफी मागितली होती. यानंतर अॅमेझॉननं लगेचंच वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...