S M L

याला म्हणतात साधेपणा!, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाने सर्वसामान्याप्रमाणे पाहिली वेरूळ लेणी!

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी जेफ बेजोस यांची ओळख आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2018 08:49 AM IST

याला म्हणतात साधेपणा!, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाने सर्वसामान्याप्रमाणे पाहिली वेरूळ लेणी!

औरंगाबाद, 23 जून :  जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती सातासमुद्रापारहुन औऱंगाबादेत येतोय, अगदी सर्वसामन्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये मिसळतो...तेही कोणतीही सुरक्षा न घेता...हा आदर्श घडवलाय जेफ बेज़ोस जे अॅमेझाॅनचे संस्थापक आहे.

औरंगाबादेतील वेरूळ लेणीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी भेट दिली. सुरक्षेच्या कारणावरून कुणालाही याची कल्पना दिली गेली नाही. अगदी ग्रामीण पोलिसांनाही याची माहिती नव्हती. अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी वेरूळ लेणी पाहिली.

या 8 जणांकडे आहे जगातली अर्धी संपत्ती !

जेफ बेजोस त्यांच्या खासगी विमानाने औरंगाबादमध्ये आले होते. बेजोस यांची पत्नी आणि मुलांसह ते ऐतिहासिक वेरूळ लेणी पाहिली. पण त्यांच्या उपस्थितीचा गवगवा झाल्याने त्यांनी अजिंठा लेणी न पाहताच आलेल्या खाजगी विमानाने परत वाराणशीला गेल्याची माहिती आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी जेफ बेजोस यांची ओळख आहे. अॅमझॉनचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या बेजोस यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 141.9 अब्ज डॉलर इतकं आहे. सोमवारीच फोर्ब्सनं जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली. यामध्ये बेजोस यांना पहिलं स्थान मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close