अमरनाथ मंदिरातील घंटानाद बंद होणार ; हरित लवादाचे निर्देश

अमरनाथ मंदिरातील घंटानाद बंद होणार ; हरित लवादाचे निर्देश

चार धामपैकी एक असलेल्या अमरनाथ मंदिरात यापुढे घंटानाद, मंत्रघोष आणि जयजयकार बंद होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानं अमरनाथला शांतता क्षेत्र घोषित केलंय.

  • Share this:

13 डिसेंबर, अमरनाथ : चार धामपैकी एक असलेल्या अमरनाथ मंदिरात यापुढे घंटानाद, मंत्रघोष आणि जयजयकार बंद होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानं अमरनाथला शांतता क्षेत्र घोषित केलंय. अमरनाथ मंदिर जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमालय पर्वतरांगात आहे. तीर्थयात्रेसाठी लाखो लोक दरवर्षी तिथं जातात. त्यामुळे तिथं हिमस्खलन आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. हे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मंदिर परिसराला शांतता क्षेत्र घोषित केलं जावं, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलाय. हिमालयातील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात एका ठराविक अंतराच्या धार्मिक विधी करण्यासही बंदी घालण्यात आलीय. तसंच शिवलिंगासमोरचं लोखंडी ग्रीलही तात्काळ हटवण्याचे आदेश हरित लवादाने दिलेत.

अमरनाथ शांतता क्षेत्र

हरित लवादाचे आदेश

- अमरनाथमध्ये घंटानाद, मंत्रघोष, जयजयकार बंद

- शिवलिंगाच्या समोरचे लोखंडी ग्रिल हटवा

- प्रवेशाच्या ठिकाणी भाविकांची योग्य तपासणी करावी

- अंतिम तपासणी केंद्राच्या पुढे मोबाईलसह इतर सामान नेण्यावर बंदी

- भाविकांना महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या

First published: December 13, 2017, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading