ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला, पोलीस घटनास्थाळी दाखल

ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला, पोलीस घटनास्थाळी दाखल

आज सकाळी झालेल्या या घटनेमध्ये दोन मजली इमारतीचा भाग पत्त्यांसारखा कोसळला. एकूण सोळा सदनिका या इमारतीत होत्या परंतु वेळीच सर्वांना बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.

  • Share this:

ठाणे, 20 नोव्हेंबर : ठाण्यातील राबोडी भागात अमर सदन या इमारतीचा भाग अचानक कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. आज सकाळी झालेल्या या घटनेमध्ये दोन मजली इमारतीचा भाग पत्त्यांसारखा कोसळला. एकूण सोळा सदनिका या इमारतीत होत्या परंतु वेळीच सर्वांना बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, TDRF, अग्निशमन दल आणि राबोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढलं. जैनब रियाज शेख ही व्यक्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकली होती. त्यालादेखील सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले  आहे. सुरय्या अक्रम शेख हिला पाठ आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर बातम्या - शिर्डीत चोरांचा माज वाढला, पोलिसांवरच केला गोळीबार

रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पण हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या अपघाताविषयी आता पोलीस कसून चौकशी करत आहे. तर अचानक इमारतीचा भाग कोसळल्याने सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, इमारतीचं ऑडिट करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

राहत्या इमारतीचा भाग कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस आणि बचापक्षाकडून सगळ्यांना मदत करण्यात येत आहे. तर इमारतीचा पडलेला भाग उचलण्याचं काम करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी परिसरात गर्दी केली. दरम्यान, आजूबाजूच्या निवासी इमारतींचंही ऑडिट करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 20, 2019, 5:45 PM IST
Tags: thane

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading