कामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड

कामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड

भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक अॅलिक पदमसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अॅलिक पदमसी.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक अॅलिक पदमसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अॅलिक पदमसी. 1982 साली आलेल्या गांधी चित्रपटात त्यांनी मोहम्मद अली जिन्नांची भूमिका केली होती.

जाहिरात क्षेत्रात त्यांची कीर्ती अतुलनीय होती.लिंटास नावाची अॅड एजन्सी त्यांनी स्थापन केली. ही अॅड एजन्सी आज भारतातल्या अग्रगण्य एजन्सीजपैकी एक आहे.त्यांच्या हमारा बजाज, कामसूत्र, लिरिल या त्यांच्या जाहिराती लोकप्रिय झाल्या. त्यांना फादर ऑफ मॉडर्न इंडियन अॅडव्हर्टायजिंग म्हटलं जायचं.

अॅलिक पदमसी यांचा अल्पपरिचय 

- जन्म - 1928 (कच्छ, गुजरात)

- 'लिंटास इंडिया' अॅड एजन्सीचे माजी सीईओ

- 100हून अधिक ब्रँड्स निर्माण करण्यात मोठा वाटा

- भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक म्हणून ओळख

- इंग्रजी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द

- गाजलेली नाटकं : 'एविटा', 'जीजस क्राईस्ट सुपरस्टार', 'तुघलक'

- संगीत नाटक अकादमीकडून जीवन गौरव पुरस्कार

- 'गांधी' चित्रपटात जिन्नांची भूमिका खूप गाजली

अनेक मान्यवरांनी पदमसी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading