खळबळजनक! आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केला 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

खळबळजनक! आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केला 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने महिलेच्या 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.

  • Share this:

राजस्थान, 12 ऑक्टोबर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. अलवर जिल्ह्यात चोवीस तासांत दोन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर आली. काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती, परंतु सीसीटीव्ही फुटेज 9 ऑक्टोबर रोजी समोर आलं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने महिलेच्या 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. जखमी अवस्थेत पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पीडित मुलीवर बलात्कार झाला त्यावेळी मुलीची आई घरी नव्हती. ती कामावर गेली होती. पीडित मुलीला जखमी अवस्थेत अलवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उद्योग नगर पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आई कारखान्यात काम करते आणि तिला चार मुलं आहेत.

इतर बातम्या - असा आहे शिवसेनेचा वचननामा, मतदारांसाठी आश्वासनांची खैरात!

आई घरी परतली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात आढळली मुलगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी आई घरी आली तेव्हा मुलगी रस्काच्या थारोळ्यात पडली होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आईने मुलीला अलवर रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि प्राथमिक उपचारानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि नंतर पीडित मुलीचा जबाब घेण्यात आला.

इतर बातम्या - पुणे हादरलं! 5 जणांनी धारदार शस्त्राने केले मित्रावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू

महिला एका वर्षापासून लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत होती

आरोपीने मुलीच्या आईचा लिव्ह-इन पार्टनर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघे गेल्या एक वर्षापासून एकत्र राहत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपचारानंतर मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डीएसपी दीपक शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

इतर बातम्या - रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने चिरडलं, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading