हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल

हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल

देशात जमावाकडून होत असलेल्या हत्या आणि वाढत चाललेला हिंसाचार हाच नरेंद्र मोदींचा क्रूर इंडिया आहे असं राहुल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.23 जुलै : जमावाकडून हत्येच्या घटनांमध्ये देशात वाढ होत असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. राजस्थानातल्या घटनेचा उल्लेख करून राहुल गांधींनी ट्विट केलंय. या हत्या आणि वाढत चाललेला हिंसाचार हाच नरेंद्र मोदींचा क्रूर इंडिया आहे असं राहुल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या अविश्वास दर्शक ठरावावरच्या चर्चेतही देशभरात जमावाकडून होत असलेल्या हत्यांचा विषय उपस्थित झाला होता.

काही दिवसांपूर्वीच राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यात गोतस्करीच्या संशयावरून रकबर खान या तरूणाला जमावाने ठार केलं होतं. रकबर खानला हॉस्पिटलमध्ये नेत असताना पोलीसांना तीन तास लागले त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. अलवर जिल्ह्यातल्या ललावंडी गावात ही घटना घडली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या गो वंश रक्षणाच्या धोरणांमुळेच हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर करत असतात. तर अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलावीत असे निर्देश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. अशा घटना या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला केंद्र सरकारला जबाबदार धरणं चुकीचं आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

जस जशा निवडणूका जवळ येत जाईल तसं काँग्रेसचा भाजपविरूद्धची टीका वाढत जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या या आक्रमक ट्विट नंतर भाजप आणि काँग्रेसचं आरोप युद्ध आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

First published: July 23, 2018, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading