राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार

राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर' असल्याचा पलटवार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.23 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर' असल्याचा पलटवार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केला आहे. देशात जेव्हा हिंसाचाराच्या घटना घडतात त्या प्रत्येक वेळी राहुल त्याचा आसुरी आनंद घेतात. राजस्थानातल्या घटनेवर तिथल्या राज्य सरकारने तात्काळ कडक पावलं उचलली आहेत. अशा घटनांवरून समाजात फुट पाडण्याचं आणि व्देष पसरविण्याचं काम करू नका. हे आता बस्स झालं. उगाच नकाश्रू ढाळण्याचं काम करू नका अशी टीकाही त्यांनी राहुल गांधींवर केली आहे. पायुष गोयल यांनी ट्विटरवरून राहुल गांधींवर हा पलटवार केला आहे.

हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल

..तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

या आधी राहुल गांधी यांनी हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं हाच मोदींचा क्रूर न्यू इंडिया आहे अशी घणाघाती टीका ट्विटवरून केली होती. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये हे ट्विटर युद्ध रंगलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यात गोतस्करीच्या संशयावरून रकबर खान या तरूणाला जमावाने ठार केलं होतं. रकबर खानला हॉस्पिटलमध्ये नेत असताना पोलीसांना तीन तास लागले त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. अलवर जिल्ह्यातल्या ललावंडी गावात ही घटना घडली होती.

Loading...

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या गो वंश रक्षणाच्या धोरणांमुळेच हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर करत असतात. तर अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलावीत असे निर्देश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. अशा घटना या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला केंद्र सरकारला जबाबदार धरणं चुकीचं आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

वीरेंद्र सेहवागचे हे ‘फनी’ फोटो पाहिलेत का?

जस जशा निवडणूका जवळ येत जाईल तसं काँग्रेसचा भाजपविरूद्धची टीका वाढत जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या या आक्रमक ट्विट नंतर भाजप आणि काँग्रेसचं आरोप युद्ध आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...