Home /News /news /

केवळ पॅटर्न समजून घेण्यासाठी दिली CAT; IIM अहमदाबादच्या माजी विद्यार्थी जोडप्यानं केलं Top

केवळ पॅटर्न समजून घेण्यासाठी दिली CAT; IIM अहमदाबादच्या माजी विद्यार्थी जोडप्यानं केलं Top

पॅटर्न समजून घेण्यासाठी दिली होती परीक्षा

पॅटर्न समजून घेण्यासाठी दिली होती परीक्षा

कॉमन अॅडमिशन टेस्टचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मारुती आणि सायली यांनी 2014 मध्ये ‘Cracku’ हे स्टार्ट-अप लाँच केलं होतं.

    मुंबई, 05 जानेवारी:  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा पोर्टलवर उमेदवारांना निकाल पाहता येत आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अनेकांनी टॉप केलं आहे. यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, ते एका दाम्पत्याने. या दाम्पत्याने (IIM-Ahmedabad alumni couple tops CAT ) कॅट परिक्षेत टॉप केलं आहे. मारुती कोंदुरी आणि सायली काळे असं या जोडप्याचं नाव आहे. या वर्षीच्या कॅट परिक्षेत मारुतीने 100 तर सायलीने 99.97 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. सायली आणि मारुती हे आयआयएम-अहमदाबादचे माजी विद्यार्थी असून ते दोघं 'Cracku' स्टार्ट-अप चालवतात. द इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. कॉमन अॅडमिशन टेस्टचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मारुती आणि सायली यांनी 2014 मध्ये ‘Cracku’ हे स्टार्ट-अप लाँच केलं होतं. परीक्षेच्या पॅटर्नमधील बदल समजून घेत आमच्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिकवता यावं यासाठी परीक्षा दिल्याचे मारुतीने सांगितले. मारुती हे मूळचे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमचे तर सायली मूळच्या महाराष्ट्रातल्या ठाण्याच्या आहेत. मारुतीने आयआयटी बॉम्बेतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. सायलीनेही त्याच विषयात बीटेक केलं. दोघांनी पहिल्यांदा 2008 मध्ये कॅट परीक्षा दिली होती. त्यावेळी मारुतीला 99.97 पर्सेंटाइल आणि सायलीला 99.91 पर्सेंटाइल गुण मिळाले होते. भारतीय वायुसेनेत Class1 Officer म्हणून जॉब हवाय? मग 'या' परीक्षेची करा तयारी 2009 मध्ये दोघांची भेट आयआयएम अहमदाबाद येथे झाली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काही काळ नोकरी केली. चांगले पॅकेज मिळाल्याने मी परदेशात नोकरी करत होतो. मात्र, त्या कामात मला समाधान मिळत नव्हते. त्यामुळे भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचे मारुती यांनी सांगितले. तर सायलीला नोकरी वगळता वेगळे काही तरी करण्याची इच्छा होती. एखाद्या कंपनीत नोकरादार म्हणून काम करण्यापेक्षा स्वत:चं स्टार्ट-अप सुरू करण्याचा माझा विचार होता. आपलं स्वत:चे स्टार्ट-अप सुरू करण्यावर आमचं एकमत झालं आणि आम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, असं सायली यांनी सांगितलं. कॅट परीक्षेत दोघांनाही चांगले यश मिळाले होते. त्यामुळे त्यांनी इतर CAT परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये ‘Cracku’ लाँच केलं. मारुती आणि सायलीने परीक्षा दिली तो काळ आणि आताचा काळ बदलला असून गेल्या काही वर्षांत परीक्षेची पद्धतदेखील बदलली आहे. त्यामुळे परीक्षेचा पॅर्टन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतः परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि त्यात टॉप केले आहे. यापूर्वीही मारुतीने CAT परीक्षा दिली आहे. त्याने 2008 नंतर 2019 मध्ये CAT परीक्षा देत त्यात 100 पर्सेंटाईल मिळवले. त्यानंतर त्याने पुन्हा 2020 मध्ये परीक्षा दिली. त्यातही त्याने 99.99 पर्सेंटाईल मिळवले होते. 2008 मध्ये जेव्हा मी परीक्षा दिली, तेव्हा परीक्षा कागदावर घेण्यात आली होती. मात्र, आता पद्धत बदलली असून परीक्षा सीबीटीमोडमध्ये (सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड) घेतली जाते. मात्र, आजही परीक्षेची काठिण्य पातळी आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची गुणवत्ता टिकून आहे. CAT परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यास करणं हाच एकमेव पर्याय असल्याचं मारुती यांनी सांगितलं. तर सराव केल्यानंतर परीक्षा पास करता येते, असं सायली यांनी सांगितलं. अनेक विद्यार्थी अभ्याक्रमाची रिव्हिजन करतात. मात्र, सराव कमी करतात. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी सराव करणं गरजेचं असल्याचेही सायली यांनी सांगितलं. Success: CAT परीक्षेत पुण्याच्या यशनं केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाला टॉपर कॅटच्या अवघड परीक्षेत दमदार यश मिळवत टॉप करणाऱ्या या दाम्पत्याचीच सध्या सगळीकडे या दोघांचीच चर्चा सुरू आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उद्देश साध्य होवो.
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या