कोरोनाच्या संकटातही लढली; नवा रोजगार सुरू केला आणि झाली 'कर्ती स्त्री'

कोरोनाच्या संकटातही लढली; नवा रोजगार सुरू केला आणि झाली 'कर्ती स्त्री'

लॉककडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद असताना या महिलांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून मेहनत जिद्द व परिश्रमच्या जोरावर रोजगार उपलब्ध करून समाजसेवा आर्थिक उन्नती आणि रोजगार हे तिन्ही उद्देश साध्य केले आहेत.

  • Share this:

अकोला, 8 एप्रिल : कोरोनाच उद्रेक झाला आणि शासनाला नियंत्रण आणण्यासाठी विविध भागांमध्ये लॉकडाउन करावं लागलं. यावेळी अनेक हातांचे काम गेले आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. परंतु अशा संकट काळात अकोल्याच्या नवदुर्गेने न डगमगता महिलांना एकत्र करून, त्यांच्या घरीच मास्क निर्मितीची सुरुवात केली. आतापर्यंत या संस्थेने 10 हजार मास्कची निर्मिती केली असून लॉकडाउनच्या काळात मास्क निर्मिती व विक्रीतून रोजगाराची नवी वाट शोधली आहे. सामाजिक सेवा व आर्थिक उन्नती हे तिहेरी उद्देश साध्य करीत मनीषा भुसारी यांनी लॉकडाऊनच्या समस्येचं संधीत रूपांतर केलं. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिलं आहे. हीच प्रेरणा घेऊन अकोल्याच्या महिलांना सोबत घेत मनीषा भुसारी यांनी 'मनश्री' संस्था सुरू केली. ज्यामुळे 10 महिलांना मास्क निर्मितीचा रोजगार मिळाला. आतापर्यंत या महिलांनी 10 हजार मास्क तयार केले आहेत. या मास्क विक्रीतुन महिलाना चांगले उत्पन्नही मिळाले. लॉकडाउनमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा रोजगार गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य झाले.

त्यामुळे महिलांना घरी राहूनच रोजगार मिळाला. या महिलांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक आधार मिळाल्याने जीवनमान उंचावले. कॉटनच्या कपड्यापासून मास्क निर्मिती केली आहे हे मास्क धुवून पुन्हा उपयोगात आणल्या जात असल्याने मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लॉकडाउनच्या काळात संसाराचा गाडा चालवण्यासाठी नेमकं काय करावं हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात धुमसत असताना, मनीषा भुसारी यांनी अनेक महिलांना मास्क निर्मितीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. यामुळे त्या महिलांच्या परिवारातील आर्थिक चणचण दूर झालीच, परंतु त्यांना घरात योग्य तो सन्मानही मिळू लागला.

हे ही वाचा-महाराष्ट्रात रेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाड; पाच जणांना अटक

मास्क निर्मितीमुळे त्यांना इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ आली नाही. जीवनात संकटांची मालिका उभी ठाकली असताना जराही न डगमगता आत्मविश्वास, सकारात्मकता, जिद्द आणि परिस्तिथीनुरूप निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे यशाचा मार्ग प्रशस्त करता येतो हे मनीषा भुसारी यांनी दाखवून दिलं आहे. लॉककडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद असताना या महिलांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून मेहनत जिद्द व परिश्रमच्या जोरावर रोजगार उपलब्ध करून समाजसेवा आर्थिक उन्नती आणि रोजगार हे तिन्ही उद्देश साध्य केले आहेत. लॉकडाउनमध्ये रोजगार शोधणाऱ्यासाठी ह्या महिला प्रेरणा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: April 8, 2021, 10:18 PM IST

ताज्या बातम्या