हक्कभंगावर मला बोलू द्या, एकनाथ खडसेंच्या मागणीला काँग्रेस,राष्ट्रवादीची साथ

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. विधानसभेतही संधी मिळेल तेव्हा खडसे सरकारची लक्तरं काढतात आणि त्यांना साथ मिळते ती विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची.c

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2018 09:07 PM IST

हक्कभंगावर मला बोलू द्या, एकनाथ खडसेंच्या मागणीला काँग्रेस,राष्ट्रवादीची साथ

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 22 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. विधानसभेतही संधी मिळेल तेव्हा खडसे सरकारची लक्तरं काढतात आणि त्यांना साथ मिळते ती विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. आज खडसेंनी त्यांच्यावरच्या आरोपांबाबतच्या हंकभंगाच्या प्रश्नावर बोलू द्या अशी मागणी अध्यक्षांना केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांना साथ दिली.

भोसरी  एमआयडीसी जमीन प्रकरणी 1 वर्ष झालं मी काही कागदपत्र मागतोय. पण मला ती दिली जात नाही. या जमिनीबाबत बैठक झाली हे प्रोसिडिंग लिहिण्यात आलं. नंतर हे प्रोसिडिंग रद्द करण्यात आलं. जर हे प्रोसिडिंग रद्द केला असेल तर त्या प्रोसिडिंग च्या आधारावर मी "पदाचा दुरूपयोग केला हा आरोप देखील रद्द होतो. ही माहिती का लपवत आहात हे समजू द्या अशी मागणी त्यांनी केली.

मी आज हक्कभंग दिलाय. या हक्कभंगावर मला बोलण्याची परवानगी मिळावी या त्यांच्या मागणीवर अध्यक्षांनी बघतो अस सांगत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र    याच मुद्याला लावून धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हक्कभंग मांडू द्या ही भूमिका घेतली. खडसे यांच्या प्रमाणे आमच्या सदस्यांनी हक्क भंग आणि विशेष अधिकार ची मागणी करतोय पण दिली जात नाही. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही माझा हक्कभंग कधी येईल याची विचारणा केली.   या सर्व चर्चना विराम देत अध्यक्षनी पुढच्या आठवड्यात घेऊ अस सांगत वेळ टाळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close