BREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक

नागपूर येथील ब्राह्मोस युनिटमध्ये पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या एका आयएसआय एजंटला ताब्यात घेण्यात आलं आहे. निशांत अग्रवाल असं या एजंटचं नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2018 02:43 PM IST

BREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक

नागपूर, 08 ऑक्टोबर : नागपूर येथील ब्राह्मोस युनिटमध्ये पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या एका आयएसआय एजंटला ताब्यात घेण्यात आलं आहे. निशांत अग्रवाल असं या एजंटचं नाव आहे.

अनेक टेक्निकल गोष्टी पाकिस्तानला तो पुरवत होता. तो नागपुरच्या ब्राह्मोस युनिटमध्ये काम करत होता आणि पाकिस्तानला तांत्रिक गुपितं देत होता.

नागपूरजवळील ब्रह्मोस मिसाइल युनिटवर सोमवारी सकाळी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि मिलिटरी इंटेलिजेंस यांच्या संयुक्त कारवाईत आरोपी आयएसआय एजंटला पकडण्यात आलं आहे.

रविवारी सुरू झालेली ही कारवाई अद्यापही सुरू आहे. त्यामुळे यात काही आणखी धागेदोरे सापडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...