केंद्र सरकारने आता सर्व डाळींवरची निर्यातबंदी उठवली

केंद्र सरकारने आता सर्व डाळींवरची निर्यातबंदी उठवली

केंद्र सरकरानं आज सगळ्या कडधान्यांची म्हणजेच सर्व डाळींवरची निर्यातबंदी उठवलीय. डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातो. यावर्षी देशात डाळींचं मोठं उत्पादन झालंय. त्यामुळे यंदा देशात अंदाजे 23 ते 24 लाख टन डाळींचा बफर स्टॉक तयार झालाय. हा साठा दरवर्षीच्या साठ्यापेक्षा खूप जास्त आहे.

  • Share this:

16 नोव्हेंबर, नवी दिल्ली : केंद्र सरकरानं आज सगळ्या कडधान्यांची म्हणजेच सर्व डाळींवरची निर्यातबंदी उठवलीय. डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातो. यावर्षी देशात डाळींचं मोठं उत्पादन झालंय. त्यामुळे यंदा देशात अंदाजे 23 ते 24 लाख टन डाळींचा बफर स्टॉक तयार झालाय. हा साठा दरवर्षीच्या साठ्यापेक्षा खूप जास्त आहे. त्याचवेळी यंदाच्या खरीप आणि रब्बीमध्ये कडधान्य पिकांचा पेराही समाधानकारक आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलीय.

या निर्णयामुळं कडधान्यांचे दर पडण्याचं प्रमाण कमी होईल. सध्या हरभरा, तूर, उडीद, मूग तसंच मसूर आणि इतर कडधान्यांचे दर प्रतिक्विंटल हमीभावापेक्षा अंदाजे 400 ते 500 रुपयांनी पडलेत. या दरात आणखी पडझड होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलाय. देशातल्या कडधान्यांची आखातीदेशात, युरोप आणि अमेरिकेत निर्यात होईल. परिणामी येत्या हंगामात कडधान्याचे दर स्थिरावण्यास मदत मिळणार आहे.

आपल्या देशाची गरज अंदाजे २ कोटी २० लाख टन डाळ इतकी आहे, गेले काही वर्ष आपलं उत्पादन १ कोटी ८० लाख ते १ कोटी ९० लाख टन या दरम्यान रेंगाळतंय. मात्र यंदा तेच डाळ उत्पादन तब्बल 2 कोटी 30 लाख टनपर्यंत पोहोचलं. म्हणूनच केंद्र सरकारने बऱ्याच कालावधीनंतर सर्व डाळींवरची निर्यातबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. डाळ उत्पादक कोरडवाडू जिरायतदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा मिळणार आहे.

First published: November 16, 2017, 7:25 PM IST

ताज्या बातम्या