Home /News /news /

अकोल्यात ठिय्या मांडून बसलेले यशवंत सिन्हा मोदी विरोधाचा राष्ट्रीय चेहरा बनताहेत का ?

अकोल्यात ठिय्या मांडून बसलेले यशवंत सिन्हा मोदी विरोधाचा राष्ट्रीय चेहरा बनताहेत का ?

अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी कापूस उत्पादकांसाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्वपक्षीय विरोधकांनी जाहीर पाठिंबा दिल्याने, हे आंदोलन आता चांगलेच चर्चेत आलंय. भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी तर थेट आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतलीय.

पुढे वाचा ...
05 डिसेंबर, अकोला : अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी कापूस उत्पादकांसाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्वपक्षीय विरोधकांनी जाहीर पाठिंबा दिल्याने, हे आंदोलन आता चांगलेच चर्चेत आलंय. भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी तर थेट आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतलीय. नाफेडने शेतकऱ्यांच्या कापसाची शंभर टक्के खरेदी करावी, यासाठी यशवंत सिन्हा अकोल्यात ठाण मांडून बसलेत. अकोल्यातील शेतकरी जागर मंचाने यशवंत सिन्हांच्या नेतृत्वात कालपासून हे आंदोलन सुरू केलंय. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माकपचे नेते सिताराम येचुरी यांनीही फोनवरून यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. तसंच सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाहीतर देशभरातून आणखी नेते अकोल्यात येऊन यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. थोडक्यात यशवंत सिन्हा आता मोदी विरोधकांचा राष्ट्रीय चेहरा बनू पाहताहेत. किंबहुना त्यांचा तसाच प्रयत्न दिसतोय. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेनंही यापूर्वीच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. यशवंत सिन्हा म्हणाले, ''आपले हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात असून, ते कोणत्याही एका राजकीय पक्षाविरोधात नाही. असं असतानाही राज्य सरकारकडून आपल्याशी गेल्या दोन दिवसांमध्ये साधा संपर्कही साधला गेलेला नाही, त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत तोपर्यंत आपण अकोल्यातून हलणार नाही, '' असा निर्धारच यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलाय. तसंच बोंड अळीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं काम हे महसूल विभागाचं असताना त्यासाठी थेट एनडीआरएफला पाचारण कसं काय केलं जाऊ शकतं ? असा परखड सवालच त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या नेत्यानेच सुरु केलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपची कोंडी केली आहे. सर्व पक्षीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या राष्ट्रवादीचेही हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारने सिन्हा यांच्या सात पैकी सहा मागण्या मान्य केल्याय पण सिन्हा यांची सातवी म्हणजेच शेतकऱ्यांचा १०० टक्के शेतीमाल हा नाफेड मार्फत हमीभावाने खरेदी करावा, ही मागणी व्यवहार्य नसल्याने ती पूर्ण होऊ शकत नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. तसंच पोलीस मुख्यालय हे काही आंदोलनाचे ठिकाण नाही, याचे भान माजी केंद्रीय मंत्र्यांनी ठेवावे, असंही अकोला पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय.
First published:

Tags: अकोला, उद्धव ठाकरे, नाना पटोले, यशवंत सिन्हा, शरद पवार

पुढील बातम्या