पतीनंतर प्रियकरानेही साथ सोडली, आता फोटोसोबत 'ती' घेणार सप्तपदी!

एका विधवा महिलेने ती प्रेम करत असलेल्या मुलाच्या फोटोसोबत सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 05:35 PM IST

पतीनंतर प्रियकरानेही साथ सोडली, आता फोटोसोबत 'ती' घेणार सप्तपदी!

अलीगड, 04 नोव्हेंबर : प्रेमाला अंत नसतो असं म्हणतात. त्याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. प्रेम कहानीचा अंत झाल्यानंतर आजही ती जिवंत आहे. ती अशी की, एका विधवा महिलेने ती प्रेम करत असलेल्या मुलाच्या फोटोसोबत सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 8 नोव्हेंबरला गावातील महादेव मंदिरात महिला प्रियकराच्या फोटोसोबत विवाह करणार आहे. या विधवा महिलेने तिच्या कुटुंबीयांना लग्नाचे कार्डही वाटले आहेत. तर या विवाहात कोणतेही व्यत्यय येऊ नये यासाठी महिलेने पोलिसांकडून सुरक्षेची मागणीही केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण...

अतरौली येथील ब्राह्मणपुरी गावात राहणारी कविता वर्मा (वय said said) हिने सांगितलं की तिला 4 मुले आहेत. आजारपणामुळे तिचा नवरा 2017 मध्ये मरण पावला. नवऱ्याच्या निधनानंतर अडीच महिन्यांनी परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय सौरभ वर्मावर तिचं प्रेम जडलं. पण त्यानंतर 2 महिन्यात तिच्या प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाला.

इतर बातम्या - साता जन्माच्या गाठी अर्ध्यावरच सुटल्या, पत्नीच्या खूनानंतर पतीने...!

Loading...

आयुष्यभर एकत्र राहण्याची घेतली शपथ

विधवा कविताने सौरभसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. म्हणूनच, तिच्या प्रियकराची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या त्याच्या फोटोसह लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 नोव्हेंबर रोजी, ती शहरातील महादेव मंदिरात प्रेमी सौरभच्या फोटोसह सात फेऱ्या घेत विवाह करणार आहे. यासाठी कविताने तिच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या नातलगांना निमंत्रण पत्रिका दिली आहे. लग्नाच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी या महिलेने एसडीएम अतरौली पंकज कुमार यांच्याकडे संपर्क साधला आहे. त्यांच्या अर्जावर एसडीएमने अतरौली पोलीस ठाण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर बातम्या - युतीमध्ये सत्तेसाठी वाद चिघळला, भाजपचे सेनेवर मोठे आरोप

मानसिक रोग विभागाच्या अध्यक्षांनुसार,

कविता एका मृत्य व्यक्तीच्या फोटोशी विवाह करणार असल्याचं डॉक्टरांना विचारलं असता, एमएयूतील जवाहरलाल मेडिकल कॉलेजच्या मानसिक रोग विभागाचे अध्यक्ष प्रो. डॉ. आरके गौर म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीशी कुणाला जास्त जवळीक असेल तर मृत्यूनंतरही ती जिवंत असल्याचं जाणवतं. तो अजूनही जिवंत आहे मेलेला नाही. अशा मानसिक स्थितीत कविताने त्याच्याशी लग्न करण्याचा विचार केला आहे. आणखी काही वर्ष ती या मानसिकतेमध्ये असेल नंतर याचा प्रभाव कमी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...