CAA Protest: जामिया, AMUमध्ये हिंसाचारानंतर तणाव; या शहरांत प्रवेश बंद

CAA Protest: जामिया, AMUमध्ये हिंसाचारानंतर तणाव; या शहरांत प्रवेश बंद

15 डिसेंबर रोजी झालेल्या निदर्शनांच्या दृष्टीने ट्रॅफिक पोलिसांनी सरीता विहार ते कालिंदी कुज (Road No. 13A) पर्यंत वाहतूक बंद ठेवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) च्या विरोधात राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या बर्‍याच भागात हिंसक निदर्शने झाली आहेत. हे लक्षात घेता स्थानिक प्रशासन अलर्ट झालं असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदबस्त आखण्यात आला आहे. रविवारी झालेला हिंसक निषेध लक्षात घेता दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिल्लीच्या काही मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या भागात लोकांची रहदारी बंद केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबर रोजी झालेल्या निदर्शनांच्या दृष्टीने ट्रॅफिक पोलिसांनी सरीता विहार ते कालिंदी कुज (Road No. 13A) पर्यंत वाहतूक बंद ठेवली आहे. तर गौतम बुद्ध नगर वाहतूक पोलिसांनी दिल्लीकडे जाणाऱ्या लोकांसाठी मदत करणारादेखील ठेवला आहे.

उत्तर प्रदेशच्या 6 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू, इंटरनेट सेवा बंद

देशाच्या विविध भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाची आग उत्तर प्रदेशातही पोहोचली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सहारनपूर, बरेली, अलिगड, बुलंदशहर, कासगंजसह 6 जिल्ह्यात कलम 144 लागू केला आहे. या जिल्ह्यांमध्ये कलम 144चे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सहारनपूर, अलिगड आणि मेरठमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, गृह विभागाने या जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी व एसपी यांना जागरुक राहण्यास सांगितले आहे.

एएमयू कॅम्पस गेटवर राडा

रविवारी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस गेटवरील विधेयकाला कडाडून विरोध केला. यावेळी निषेध करणार्‍या विद्यार्थ्यांचा पोलिसांशी चकमकही झाला, त्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रू धुराचा आणि वॉटर कॅनॉनचा वापर केला. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाजवळ निषेध झाल्यानंतर एएमयूच्या विद्यार्थ्यांनीही निषेध नोंदवला. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने 5 जानेवारी 2020 पर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगालमधील 6 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

पश्चिम बंगालमधील 6 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, हावडा, उत्तर 24 परगना आणि दक्षिण 24 परगनातील काही भागांत इंटरनेट सेवेवर बंदी घातली आहे. रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे राज्य प्रशासन आणि पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उच्च सतर्कतेचे निर्देश दिले.

पाटण्यातील कारगिल चौकात झालेल्या निषेधादरम्यान, दरोडेखोरांनी पोलीस चौकीसह चार वाहनांना आग लावली. तसेच त्यांच्याकडून केलेल्या दगडफेकीत 12हून अधिक पोलीस जखमी झाले. तथापि, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.

या सगळ्या हिंसक आंदोलनामुळे शनिवारी विद्यापीठाने परीक्षा रद्द केली आणि तणाव लक्षात घेता 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. हिंसाचारानंतर ताबडतोब जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्य वकील वसीम अहमद खान यांनी रविवारी दावा केला की दिल्ली पोलीस कर्मचार्‍यांनी विना परवानगी विना जबरदस्ती विद्यापीठात प्रवेश केला आणि कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना परिसर सोडून जाण्यास भाग पाडले. विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आणि सांगितले की, ग्रंथालयामधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे आणि ते सुरक्षित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi
First Published: Dec 16, 2019 09:59 AM IST

ताज्या बातम्या