ई कॉमर्सचे बादशहा - जॅक मा होणार रिटायर

जगातल्या सर्वांत मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी ५४ व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2018 01:12 PM IST

ई कॉमर्सचे बादशहा - जॅक मा होणार रिटायर

अलिबाबा.कॉम या जगातल्या बड्या ई कॉमर्स कंपनाचे संस्थापक आणि संचालक जॅक मा यांनी आपण लवकरच निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलंय.

अॅमेझॉनला टक्कर देणाऱ्या अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचे प्रमुख जॅक मा  यांनी ५४ व्या वर्षीच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की १० सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते निवृत्त होणार आहेत.

जॅक यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात ही शिक्षक म्हणून केली.  शिक्षाकापासून उद्योजकापर्यंत आणि जगातल्या श्रीमंतांपैकी याचाएक होण्यापर्यंतचा जॅक यांचा प्रवास अचंबित करणारा आहे.

जॅक यांनी 1999मध्ये हांगझूच्या एका अपार्टमेंटमध्ये अलीबाबा कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना बिनकामाचा रिकामटेकडा माणूस समजले.

VIDEO - : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे?

बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्ससारखं त्यांच्य़ाकडे देखील कंप्युटर सायन्सची कुठलीच डिग्री नव्हती. १९८०मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली आहे. तीन वर्षानंतर त्यांनी ती नोकरा सोडून स्वतःची कंपनी सुरू केली.

1994मध्ये जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अमेरिकेत गेले होते. तेव्हा त्यांनी पहिलांदा इंटरनेट पाहिलं आणि ते थक्क झाले. त्यानंतर चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' या नावाने प्रसिद्ध झाले.

21 फेब्रुवारी 1999ला जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली.

हे यश त्य़ांना सहजासहजी नाही मिळालेलं. तब्बल ३० नोकऱ्यांध्ये निराशा मिळाल्यानंतर त्यांनी अलिबाबा सुरू करण्याचं ठरवलं.

चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे फाऊंडर जॅक मा आशियातील सर्वात राईस व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण वेल्थ 3740 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे.

२०१३ पर्यंत ते अलिबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष म्हणून या कंपनीचा कारभार सांभाळला. आणि आता सोमवारी ते त्यांच्या कामातून निवृत्ती घेणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close