S M L

VIDEO: प्रेमात आकंठ बुडाली आलिया, मुलाखतीदरम्यान वरुणला रणबीर म्हणून मारली हाक

एका वाहिनीसाठी आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर मुलाखत देत होते. दरम्यान, वरुण तिचे केस ओढत आलियाला त्रास देत होता.

Updated On: Apr 16, 2019 01:49 PM IST

VIDEO: प्रेमात आकंठ बुडाली आलिया, मुलाखतीदरम्यान वरुणला रणबीर म्हणून मारली हाक

नवी दिल्ली, १६ एप्रिल- आनंदी असणं म्हणजे काय याचा खरा अर्थ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी कोणी सांगू शकतं तर ती म्हणजे आलिया भट्ट. एकीकडे तिचे सर्व सिनेमे सुपर हिट होत आहेत तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही सर्व काही सुरळीत सुरू आहे. सध्या आगामी 'कलंक' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान आलिया रणवीरच्या किती प्रेमात आहे हे तिनेच पुन्हा एकदा दाखवून दिलं.

त्याचं झालं असं की एका वाहिनीसाठी आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर मुलाखत देत होते. दरम्यान, वरुण तिचे केस ओढत आलियाला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून आलियाने त्याला ‘रण.. वरुण नको करू.’ साऱ्यांनाच तेव्हा कळून आलं की तिच्या तोंडी रणबीरचं नाव येणार होतं पण तिने अथक प्रयत्नांनी ते रोखलं पण तोवर तिथे उपस्थित सारेच हसू लागले आणि आलिया लाजेने लालबूंद झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया लवकर लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. एका पुरस्कार सोहळ्यात रणबीर आलियाला किस करण्याचा प्रयत्न करतानाही दिसला. दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

लवकरच आलिया- रणबीर 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही असणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पुढच्या वर्षी पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.

Loading...

SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 01:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close