महेश भट्ट यांनी कधीही न पाहिलेला आलियाचा हा व्हिडिओ शेअर केला

आलियाचा हा व्हिडिओ पाहून कोणीही म्हणेल की आलिया आता जेवढी क्यूट आहे तेवढीच ती लहानपणीही होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 06:49 PM IST

महेश भट्ट यांनी कधीही न पाहिलेला आलियाचा हा व्हिडिओ शेअर केला

मुंबई, १५ मार्च २०१९- स्टुडंट ऑफ दी इयर, हायवे, राझी, उडता पंजाब, गली बॉय यांसारख्या सिनेमातील अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या आलिया भट्टचा आज २६ वा वाढदिवस. संपूर्ण बॉलिवूडमधून तिच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फक्त मित्र- परिवारच नाही तर तिचे लाखो चाहतेही तिच्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा पाठवत आहेत.

यासगळ्यात आलियाचे वडील महेश भट्ट यांनी सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आलिया अगदी एक ते दोन वर्षांची असेल तेव्हाचा आहे. या व्हिडिओमध्ये ती महेश यांच्या पोटावर बसलेली दिसत आहे. यात महेश आलियाला हॅपी बर्थ डे म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहेत.


लहानपणीही फार क्यूट होती आलिया

आलियाचा हा व्हिडिओ पाहून कोणीही म्हणेल की आलिया आता जेवढी क्यूट आहे तेवढीच ती लहानपणीही होती. आलियाची आई सोनी राजदान यांनीही आलियासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Loading...

दरम्यान, यावर्षी आलियाच्या वाढदिवसाला बॉयफ्रेंड रणबीरनं तिला खास सरप्राइझ दिलं. त्यानं मध्यरात्री आलियाच्या घरी जाऊन तिला विश केलं आणि बर्थडे सेलिब्रेट केला. काही दिवसांपूर्वी आलिया रणबीरमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र रणबीर आलियाला विश करण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी पोहोचल्यानं या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला.आलिया आणि रणबीरला या आधीही अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. तसंच ते दोघंही एकमेकांच्या फॅमिली सोबत वेळ घालवताना दिसतात. एवढंच नाही तर आलिया रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना भेटायला न्यूयॉर्कलाही जाऊन आली. आलिया आणि रणबीर लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. हा या जोडीचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...