VIDEO : कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची दारूपार्टी; बायको आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाय खेचत काढलं कॉलनीबाहेर...

VIDEO : कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची दारूपार्टी; बायको आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाय खेचत काढलं कॉलनीबाहेर...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दारू पिऊन कॉलनीत फिरत असल्याचं पाहून लोकांना धक्काच बसला. यानंतर मात्र रुग्णाचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे : अद्यापही देशात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास यश मिळालेलं नाही. त्यात अनेक ठिकाणी नियमांंचं उल्लंधन केल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. त्यातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण ड्रामा करीत असल्याचं दिसत आहे.

दारूच्या नशेत कोरोना रुग्ण कॉलनीत पोहोचला तर गोंधळ उडाला. त्यानंतर मात्र आरोग्य कर्मचारी आणि कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीला पत्नी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उचलून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविलं. त्यानंतर मात्र भरपूर दारू प्यायलेल्या या रुग्णाला क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर मात्र या कोरोना रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आलं.

हे ही वाचा-COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) गंभीर रूप धारण केलेलं असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स आणि लस अशा सगळ्या आवश्यक घटकांची वानवा आहे. इतकी कठीण परिस्थिती असूनही,का ही ठिकाणी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी तरी वाढू लागल्याने येत्या काही दिवसांत लाट ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तरीही सुटकेचा निश्वास सोडण्यासारखी परिस्थिती अद्याप आलेली नाही. कारण लवकरच कोरोना संसर्गाची तिसरी लाटही (Coronavirus Third Wave) येण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 6, 2021, 4:58 PM IST

ताज्या बातम्या