मुंबई, 05 मे : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी परवाणगी देण्यात आली खरी पण मुंबईतील मद्यप्रेमींना मात्र उद्यापासून दारू मिळणार नाही. मुंबईसारख्या रेड झोनमध्ये दारूसाठी तळीरामांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईत दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे.
सोमवारी दारूची दुकानं उघडताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. यात सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. त्यामुळे सोशल मीडियावरून आणि इतर नागरिकांकडून लोकांची गर्दी वाढली असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पालिकेकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात दीड महिन्यापासून अनावश्यक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.
BREAKING: सर्वात मोठी बातमी, या राज्याने 29 मेपर्यंत वाढवला Lockdown
पालिकेने पत्रात म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करताच नागरिकांनी रत्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. अशात सोशल डिस्टंसिंग देखील पाळलं जात नसल्यामुळे मुंबईत उद्यापासून आधीसारखेच लॉकडाऊन पाळले जाईल. त्यामुळे अनावश्यक सेवांवर पुन्हा पालिकेने बंदी घातली आहे.
आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला 6 तरुणांनी केली बेदम मारहाण, घटना CCTVमध्ये कैद
दीड महिने दारू न मिळाल्यामुळे तलफ भागवण्यासाठी मुंबईकरांनी रस्त्यावर गर्दी केली. यामुळे पालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. बुधवारपासून मुंबईत फक्त अत्यावश्यत सेवांनाच परवाणगी देण्यात आली आहे.
'या' फोटो मागची कहाणी वाचून मुंबई पोलिसांबद्दल वाढेल अभिमान!
संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.