S M L

तरुणाईसाठी भारत 'सुसाइड कॅपिटल'? आत्महत्या करणारी जगातली ३ पैकी १ स्त्री भारतीय

गेल्या २५ वर्षांत भारतात झालेल्या आत्महत्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. यात तरुणांची आणि त्यातही स्त्रियांची संख्या मोठी आहे हे विशेष. १५ ते ३९ वयोगटात आत्महत्या करणाऱ्या विवाहित स्त्रियांची संख्या यात जास्त आहे.

Updated On: Sep 14, 2018 02:45 PM IST

तरुणाईसाठी भारत 'सुसाइड कॅपिटल'? आत्महत्या करणारी जगातली ३ पैकी १ स्त्री भारतीय

मुंबई, १४ सप्टेंबर : काही वर्षांपूर्वी निर्भया बलात्कार प्रकरणानंतर जगभरात भारताची प्रतिमा रेप कॅपिटल अशी झाली होती. आता सुसाइड कॅपिटल म्हणून नवी ओळख बनते की काय अशी भीती आहे. नव्यानेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात तरुण स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या ३ पैकी एक आत्महत्या करणारी स्त्री भारतीय असते. विशेष म्हणजे विवाहित तरुण स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे.

लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार भारतात झालेल्या आत्महत्यांपैकी ६३ टक्के तरुणांनी केलेल्या आहेत.  भारतीय तरुणाईच्या मृत्यूचं सर्वांत मोठं कारण आत्महत्या आहे.

गेल्या २५ वर्षांत भारतात झालेल्या आत्महत्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. यात तरुणांची आणि त्यातही स्त्रियांची संख्या मोठी आहे हे विशेष. १५ ते ३९ वयोगटात आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांची संख्या यात जास्त आहे. स्त्रियांच्या आत्महत्येची संख्या पाहिली तर जगातल्या १०पैकी ४ आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया भारतीय असतात.

२०१६मध्ये १५ ते ३९ या वयोगटातल्या 1,45,567 तरुणांनी आत्महत्या केली. तरुणाईच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण आपल्या देशात आत्महत्या आहे. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्येपेक्षाही आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २०१६ मध्ये दीड लाखावर तरुणांनी आत्महत्या केली तर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1,15,714 होती.

तरुण विवाहित स्त्रियांचं प्रमाण मोठं

Loading...

मानसिक तणाव हे अर्थातच आत्महत्यांचं मुख्य कारण आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण विवाहित स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे जागतिक आकडेवारीचा विचार केला तर विवाहित स्त्रिया आत्महत्या करण्याचं प्रमाण कमी असतं. त्यापेक्षा जास्त प्रमाण एकट्या स्त्रियांचं असतं. पण जागतिक आकडेवारीच्या दुप्पट विवाहित स्त्रिया भारतात आत्महत्या करताना दिसतात. म्हणजेच विवाहातून अपेक्षित असणारं मानसिक स्थैर्य, आनंद किंवा सुरक्षितता भारतीय तरुणींना अद्यापही मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 02:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close