News18 Lokmat

अक्षयकुमारही लहानपणी 'नको त्या स्पर्शा'चा शिकार बनला होता!

अक्षयकुमार लहान असताना त्याच्यात बिल्डिंगमधल्या लिफ्टमनने त्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 05:27 PM IST

अक्षयकुमारही लहानपणी 'नको त्या स्पर्शा'चा शिकार बनला होता!

मुंबई, 28जुलै : बॉलीबूड अभिनेता अक्षयकुमार याला देखील लहाणपणी लैगिंक अत्याचाराचं शिकार व्हावं लागलं होतं. स्वतः अक्षयकुमारनेच मुंबईत भरलेल्या मानवी तस्करीसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना हा अनुभव सर्वांसमोर कथन केला. अक्षयकुमार लहान असताना त्याच्यात बिल्डिंगमधल्या लिफ्टमनने त्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी घाणेरड्या प्रकाराबाबत तात्काळ आई वडिलांना सांगितलं, त्यांनी या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार केली, त्याने यापूर्वीही अशाप्रकारचे गुन्हे केल्याचं उघड झालं. त्यामुळे सोसायटीने त्याला कामावरूनही काढून टाकलं. असंही अक्षयकुमारने सांगितलं.

या मानव तष्करीविरोधी परिषदेत अक्षयकुमारने पालक आणि मुलांचा संवाद वाढण्यावर आवर्जून जोरही दिला. पालकांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला तरच अशा घटनांना आळा बसेल, असंही अक्षयकुमारने सांगितलं. तो सध्या टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सोनम कपूर आणि कल्की कोचलिन या कलाकारांनीही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लैंगिक शोषणासंबंधीच्या घटना सर्वांसमोर उघड केलेल्या आहेत. अक्षयकुमारनेही मुलांना अशा घटनांबाबत खुल्यापणाने बोलण्याचं आवाहन केलं. कुणाच्या आयुष्यात असं काही घडलं असेल तर त्यांनी न घाबरता तात्काळ पालकांना सांगावं आणि पोलिसात तक्रारही करावी, जेणेकरून अशा नराधमांना शिक्षा होईल, असंही अक्षयकुमारने यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...