अक्षय कुमारच्या ‘कंचना’मध्ये अमिताभ बच्चन साकारणार चक्क ट्रान्सजेंडरची भूमिका

अक्षय कुमारच्या ‘कंचना’मध्ये अमिताभ बच्चन साकारणार चक्क ट्रान्सजेंडरची भूमिका

मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमात कियारा आडवाणी ही अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

  • Share this:

मुंबई, २४ एप्रिल- दाक्षिणात्य सिनेमांची चर्चा सध्या सगळीकडेच होताना दिसत आहे. देशभरात या सिनेमांचे चाहते सातत्याने वाढत आहेत. तमिळ सिनेमांमधील सर्वात नावाजलेला 'मुनी २- कंचना' हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता त्याचा हिंदी रिमेक होत आहे. या रिमेकमध्ये अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

त्याच्या भूमिकेचं नाव राघव असून त्याच्यात एक तृथीयपंथी महिलेची आत्मा असते आणि त्या आत्म्याचा हेतू तिच्या मृत्यूचा सूड घेणं असतो. अक्षयने या सिनेमाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. आता या सिनेमाशी अजून एक मोठं नाव जोडलं जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा

डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंचनाच्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ करिअरमध्ये पहिल्यांदा तृथीयपंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमात ते कंचनाच्या भूमिकेत दिसतील. कंचना ही एक अशी तृतीयपंथी महिला असते जी आपल्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी राघवच्या शरीरात जाते. तमिळ सिनेमात ही भूमिका आर. शरद कुमारने साकारली होती.

अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी

१९८१ मध्ये आलेल्या 'लावारिस' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' या गाण्यातही शहेनशहा यांनी महिलाची व्यक्तिरेखा साकारली होती. सध्या या सिनेमाचं शिर्षक नक्की झालं नसून 'लक्ष्मी' असं नाव ठेवलं जाऊ शकतं अशी चर्चा बी- टाऊनमध्ये सध्या सुरू आहे. मूळ सिनेमाच्या संहितेत अनेक बदल करण्यात आले असून बॉलिवूडच्या प्रेक्षकांची आवड पाहून कथेत बदल केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमात कियारा आडवाणी ही अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

First published: April 24, 2019, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading