मुंबई, ०६ मार्च २०१८- स्टंटच्या बाबतीत अक्षय कुमारचा हात कोणीच पकडू शकत नाही. सध्या या खिलाडी कुमारचे आगीशी स्टंट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी त्याने स्वतःच्या अंगाला आग लावून घेतली. एवढंच नाही तर अंगाला आग लावून त्याने रॅम्प वॉकही केला. त्याचे झाले असे की, अक्षयने अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत द एण्ड नावाची वेबसीरिज करत आहे. याचीच घोषणा करण्यासाठी अक्षयने या जीवघेण्या स्टंटची मदत घेतली.
Crap! This is how I find out that you decided to set yourself on fire ! Come home and I am going to kill you-in case you do survive this! #GodHelpMe https://t.co/K7a7IbdvRN
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) March 5, 2019
अक्षयला अशाप्रकारे रॅम्प वॉक करताना पाहून तिथे उपस्थितांनी तर टाळ्यांचा कडकडाट केला. पण, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाला त्याचा हा स्टंट अजिबात आवडला नाही. सोशल मीडियावर अक्षयला धमकावत तिने ट्वीट केले. ‘बकवास.. अशा प्रकारे मला कळलं की तू स्वतःला आग लावण्याचा निर्णय घेतला आहेस. जर तू यातून वाचलास तर घरी ये.. घरी येऊन मी तुझा जीव घेईन.. देवा मला वाचव..’ असं ट्वीट ट्विंकलने केलं.
अक्षय कुमारनेही त्याचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. याच ट्वीटला रिट्वीट करताना ट्विंकलने हा मेसेज अक्षयसाठी लिहिला. अमेझॉन प्राइम पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम करत आहे. याआधी त्यांनी इनसाइड एज, ब्रीद, मिर्झापुर, फोर मोअर शॉट्स प्लीज आणि वेला राजा यांसारख्या वेबसीरिज तयार केल्या आहेत.