अकोल्यातील यशवंत सिन्हा यांचे ठिय्या आंदोलन अखेर स्थगित

अकोल्यातील यशवंत सिन्हा यांचे ठिय्या आंदोलन अखेर स्थगित

अकोला पोलीस मुख्यालयात भाजपचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनी सुरु केलेलं ठिय्या आंदोलन अखेर सरकारच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या फोनवरून यशवंत सिन्हा यांच्याशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी केली होती.

  • Share this:

06 डिसेंबर, अकोला : अकोला पोलीस मुख्यालयात भाजपचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनी सुरु केलेलं ठिय्या आंदोलन अखेर सरकारच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या फोनवरून यशवंत सिन्हा यांच्याशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी केली होती. पण लेखी आश्वासनावर ते ठाम होते. त्यानंतर अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंबंधीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपलं ठिय्या आंदोलन स्थगित केलंय.

सरकारने कापूस उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर पुन्हा आंदोलन करू, असंही यशवंत सिन्ही यांनी म्हटलंय. गेल्या तीन दिवसांपासून यशवंत सिन्हा अकोला पोलीस मुख्यालयातच ठाण मांडून बसल्याने राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, यासाठी सरकारने तात्काळ ठोस उपाय योजना कराव्यात तसंच शेतकऱ्यांचा कापूस नाफेडमार्फत खरेदी करावा, अशी मागणी यशवंत सिन्हा यांनी केली होती. सरकारने यासंबंधीचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच यशवंत सिन्हांनी त्यांचं ठिय्या आंदोलन स्थगित केलंय. शेतकरी संघटनेसोबतच, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता.

First published: December 6, 2017, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading