09 जानेवारी, लखनौ : मोदी सरकारला 2019च्या लोकसभा निवडणुकीत हरवू पाहणाऱ्या विरोधकांना मोठा धक्का बसलाय. 2019मध्ये काँग्रेससोबत युती करण्यास समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव अनुत्सुकता दाखवलीय. गेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीत 'युपी के लडके' म्हणून समोर आलेल्या राहुल -अखिलेशनं जोरदार प्रचार केला. पण तरीही तिथं सपाचा दारूण पराभव झाला. म्हणूनच अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्यास फारसा अनुकूलता दर्शवलेली नाही. मी आता फक्त समाजवादी पार्टीला मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.
अखिलेश यादव म्हणाले, ''मी आणि राहुल गांधी यापुढेही मित्र म्हणून कायम राहू पण त्यांच्या काँग्रेस पक्षासोबतची मैत्री यापुढेही कायम ठेवण्याची कोणताही विचार नाहीये.''
उत्तरप्रदेशच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाऊनही पक्षाला काहीच फायदा झालेला नाही त्यामुळे आम्ही आता समाजवादी पार्टीच्या पुनर्बांधनीवर लक्षं केंद्रीत करणार असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्याने 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्व भाजपविरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधून मोदींचा पराभव करण्याचे मनसुबे राहुल गांधींनी आत्तापासून रचलेत. पण त्यांचे मित्र अखिलेश यादव यांनीच त्यांच्या या स्वप्नांना सुरुंग लावलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akhilesh yadav, Rahul gandhi, Sp - congress