S M L

VIDEO: आकाश अंबानीच्या वरातीतला शाहरुख खानचा डान्स पाहिलात का?

नुकतीच जिओ वर्ल्ड सेंटरकडे आकाश अंबानीची वरात निघाली आहे. या वरातील अनेक बॉलिवूड स्टार्स मिका सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसले.

Updated On: Mar 9, 2019 08:08 PM IST

VIDEO: आकाश अंबानीच्या वरातीतला शाहरुख खानचा डान्स पाहिलात का?

मुंबई, ०९ मार्च २०१९- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आज बोहल्यावर चढणार. संध्याकाळी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आकाश त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहतासोबत लग्न बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकारणांपर्यंत आणि हॉलिवूड कलाकारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सारेच या शाही लग्नाला उपस्थित राहत आहेत.

आकाश आणि श्लोकाच्या लग्नासाठी जिओ वर्ल्ड सेंटर हे नववधूप्रमाणे सजवण्यात आलं आहे. लग्न सोहळ्याच्या प्रवेशद्वारापासूनच लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली आहे. कोणीही विचार करू शकणार नाही अशी फुलांची सजावट या लग्नमंडपामध्ये दिसते.

नुकतीच जिओ वर्ल्ड सेंटरकडे आकाश अंबानीची वरात निघाली आहे. या वरातील अनेक बॉलिवूड स्टार्स मिका सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसले. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा निता अंबानी आणि स्वतः आकाश अंबानी नाचताना दिसत आहेत.


या लग्नाच्या VIP यादीत संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बान की मून आणि त्यांच्या पत्नी, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नी चेरी ब्लेयर, Google चे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांची पत्नी अंजली पिचाई, सचिन आणि अंजली तेंडुलकर आहेत. लग्नाला देशातले आणि जगभरातले अग्रणी व्यावसायिकही आले आहेत. या यादीत सॅमसंगचे व्हाइस प्रेसिडेंट जे वाई ली, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे कार्यकारी बोर्डाचे सदस्य क्रिस्टोफ डी केपर, सौदी सरकारचे मंत्री खालिद अल फलीह, बेल्जियमचे राजनीती तज्ज्ञ आणि युरोपीय संसदेतले सदस्य वेरोनिक डी पेपर, नेटफ्लिक्सचे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्स यांचीही नावं आहेत.

याशिवाय सौदी पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाचे प्रमुख यासिर अल-रुमैयन आणि त्यांची पत्नी, टाटा संस्थेचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि त्यांची पत्नी ललिता, कोका-कोलाचे सीईओ जेम्स क्विन्सी, पूर्व अमेरिकेतल्या काँग्रेसचे एरिक कँटर आणि त्यांची पत्नी, मॉर्गन स्टेनली बँकर माइकल ग्रिम्स आणि त्यांची पत्नी, डॉव केमिकलचे अध्यक्ष एंड्रयू लिवरिस आणि त्यांची पत्नी पाऊला, ग्लोबल कॉर्पोरेट अँड इन्व्हेस्टमेंट बँकेचे चेअरमन सौदी अमेरिकेचे वरिष्ठ एमडी अहमद अल-सुबे ही मंडळी लग्नासाठी उपस्थित असतील.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता, रेल्वे मंत्री पीयुष गोयल, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू आणि माजी वाणिज्य मंत्री आनंद शर्मा या लग्नाला उपस्थित असतील.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 08:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close