मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! पुण्यातील 'त्या' गोळीबाराबाबत गूढ वाढलं; AK 47 बंदुकीतून झाडल्या गोळ्या?

धक्कादायक! पुण्यातील 'त्या' गोळीबाराबाबत गूढ वाढलं; AK 47 बंदुकीतून झाडल्या गोळ्या?

घटनास्थळी आढळून आलेले रिकामी काडतुसे AK 47 बंदुकीतून झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

घटनास्थळी आढळून आलेले रिकामी काडतुसे AK 47 बंदुकीतून झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Gun Firing in Pune: बुधवारी सायंकाळी पुण्यातील कोथरूड मेट्रो कारशेड परिसरात AK47 बंदुकीतून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेबाबत संरक्षण विभागानं स्पष्टीकरण दिल्यानंतर पुणे पोलिसांसमोरील आव्हान वाढलं आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 27 ऑगस्ट: बुधवारी सायंकाळी पुण्यातील कोथरूड मेट्रो कारशेड परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याठिकाणी जाऊन पाहाणी केली असता पोलिसांना दोन ते तीन रिकामी काडतुसं आढळली आहे. त्यानंतर गुरुवारी दुपारी देखील अशाच प्रकारे काही काडतुसे आढळली आहेत. शिवाय या गोळीबारात महामेट्रोचा एक कर्माचारी जखमी झाला असून गोळी कर्मचाऱ्याच्या छातीला चाटून गेल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली होती. पण हा गोळीबार नेमका कोणी केली, याबाबत कोणतीही माहिती पुणे पोलिसांना मिळाली नाही. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटनास्थळी आढळून आलेले रिकामी काडतुसे AK 47 बंदुकीतून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा गोळीबार संरक्षण दलातील जवानाकडून झाला असावा, असा मानस पुणे पोलिसांचा होता. मात्र संरक्षण दलाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. ही गोळीबार संरक्षण दलाच्या कोणत्याही जवानाकडून होणं शक्य नसल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या गोळीबाराबाबत गूढ वाढलं आहे. हेही वाचा-मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर; थरारक घटनेचा VIDEO आला समोर कोथरूड मेट्रो कारशेड परिसरात संरक्षण विभागाचं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण केंद्र अथवा युनिट नाहीये, त्यामुळे संबंधीत गोळीबार प्रकरणाशी संरक्षण विभागाचा काहीही संबंध नसल्याचं संरक्षण विभागाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे AK 47 बंदुकीतून कोण गोळीबार करू शकतो? याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहे. संरक्षण विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण दिल्यानंतर संबंधित गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. हेही वाचा-पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार याप्रकरानंतर पुणे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला आहे. या घटनेची संबंधित असणाऱ्या संशयितांचा शोध घेतला जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली आढळतात का? त्या अनुषंगानं तपासही केला जात आहे.
First published:

Tags: Crime news, Pune

पुढील बातम्या